Nagpur Ganesh : गणपती बाप्पाच्या समोर मिळणार बुस्टर डोस, लसीकरणासाठी नागपुरात लागणार आरोग्य विभागाचे स्टॉल

| Updated on: Aug 31, 2022 | 7:43 PM

जिल्ह्यातील सर्व नागरिकांना बुस्टर डोस देण्याबाबत आरोग्य विभागाला सूचना केली आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव आपल्या आरोग्याप्रती जागरूकता दाखवावी. सर्व नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे त्यांनी स्पष्ट केले.

Nagpur Ganesh : गणपती बाप्पाच्या समोर मिळणार बुस्टर डोस, लसीकरणासाठी नागपुरात लागणार आरोग्य विभागाचे स्टॉल
लसीकरणासाठी नागपुरात लागणार आरोग्य विभागाचे स्टॉल
Follow us on

नागपूर : महानगरासह जिल्ह्यामध्ये आजपासून बाप्पांचे आगमन झाले. त्यानिमित्ताने संपूर्ण जिल्हा गणरायाच्या स्वागतासाठी सज्ज आहे. मात्र यासोबतच कोरोनाचा बुस्टर डोस देण्यासाठी व बुस्टर डोस घेण्यासाठी नागरिकांनी व मंडळांनी सामाजिक दायित्व निभवावे. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर (Dr. Vipin Itankar) यांनी गणेश भक्तांना शुभेच्छा देताना केले आहे. संपूर्ण महाराष्ट्राची देशात ओळख असणारा गणेश उत्सव बुधवारपासून सुरू होत आहे. त्यामुळे मोठ्या गणेशोत्सवांनी आरोग्य विभागाला बूस्टर डोस लावण्यासाठी स्टॉल करिता जागा द्यावी. आरोग्य विभागाच्या (Health Department) कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक भाविक भक्ताला बुस्टर डोस द्यावे. कोरोनापासून (Corona) सुरक्षित करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे

या संदर्भात आरोग्य, गृह, महसूल व अन्य विभागाचा जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला. त्यांनी शांततेत, धार्मिक सौहार्द राखत, आनंदाने यावर्षीचा गणेशोत्सव साजरा करण्याच्या आवाहन जनतेला केले. गेल्या दोन वर्षानंतर कोरोनाच्या सावटातून बाहेर पडल्यानंतर हा गणेश उत्सव होत आहे. मात्र जगातल्या अनेक भागात कोरोना अद्याप आहे. कोरोनापासून बचावासाठी एकमेव उपाय म्हणजे लसीकरण आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांना बुस्टर डोस देण्याबाबत आरोग्य विभागाला सूचना केली आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव आपल्या आरोग्याप्रती जागरूकता दाखवावी. सर्व नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे त्यांनी स्पष्ट केले.

न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याचे आवाहन

गणेशोत्सवाच्या आगमनाच्या व विसर्जनाच्या मिरवणुकीत शिस्त ठेवण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. याशिवाय विसर्जन हे कोणत्याही परिस्थितीत सर्व ठिकाणी कृत्रिम जलकुंभात झाले पाहिजे. न्यायालयाने दिलेल्या आदेशाची पायमल्ली होता कामा नये, असेही त्यांनी पोलीस विभागाला स्पष्ट केले आहे. महापालिकेने सर्व मिरवणुकीच्या ठिकाणी व विसर्जनाच्या ठिकाणी कुत्रीम जलकुंभाची, प्रकाशाची व अन्य आवश्यक व्यवस्था करण्याचे निर्देश त्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात तसेच महापालिका क्षेत्रामध्ये सुद्धा कृत्रिम जलकुंभ तयार करून त्याच ठिकाणी विसर्जन करावे. नैसर्गिक जलसाठे अशुद्ध होणार नाही. यासंदर्भात न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करावे, असेही त्यांनी शेवटी स्पष्ट केले आहे.

हे सुद्धा वाचा