नागपूरहून शिर्डीला थेट विमान, शुक्रवारपासून फ्लाईट होणार सुरू, तासाभरात घेता येणार साईबाबांचे दर्शन

| Updated on: Feb 15, 2022 | 1:04 PM

नागपुरातून विमानाने साई दर्शनासाठी शिर्डीला जाता येणार आहे. अलायन्स एअरच्या एटीआरची शिर्डी उड्डान सेवा शुक्रवारपासून सुरू करण्याची घोषणा केली. त्यामुळे प्रवाशांच्या वेळेची आता बचत होणार आहे. एका तासात साईबाबांचे दर्शन नागपूरकरांना घेता येणार आहेत.

नागपूरहून शिर्डीला थेट विमान, शुक्रवारपासून फ्लाईट होणार सुरू, तासाभरात घेता येणार साईबाबांचे दर्शन
प्रातिनिधीक फोटो
Follow us on

नागपूर : एअर इंडियाची भागिदार एअर लाइन्स कंपनी शुक्रवारपासून म्हणजे 18 फेब्रुवारीपासून हैद्राबाद-पुणे नागपूर- शिर्डी फ्लाईट (Airlines) सुरू करणार आहे. कंपनी मुख्यालयाच्या वतीनं या संदर्भात एअर इंडियाच्या स्थानिक कार्यालयाशी विचारणा करण्यात आली. एअर इंडियाने नागपूर एअरपोर्टवरून (Airport) या फ्लाइटच्या संचालनास हिरवी झेंडी दिली आहे. प्राप्त माहितीनुसार, अलायन्स एअर या मार्गासाठी एटीआर 72 सीटर विमान लवकरच सुरू करणार आहे. रिजनल कनेक्टीव्हिटी अंतर्गत हे संचलन होणार असल्याची माहिती आहे. असे झाल्यामुळे विमानाचे भाडेही कमी होण्याची शक्यता आहे. हे विमान सकाळी हैद्राबाद येथून उड्डान भरेल. पुणे येथे उतरेल. त्यानंतर दुपारी पुणे येथून नागपूरला पोहचेल. नागपूरवरून शिर्डीसाठी (Nagpur to Shirdi) उड्डाण भरेल. त्यामुळं नागपूर ते शिर्डी हे अंतर आता एका तासात पोहचता येणार आहे.

पर्यटकांसाठी चांगली सुविधा

पुणे, नागपूर व हैद्राबाद येथील जाणे-येणेही मोठ्या प्रमाणात वाढले. उद्योगपती, व्यापारी, विद्यार्थी यांनीही ही फ्लाईट सोयीची होणार आहे. शिर्डीला या मार्गाशी जोडण्यात आलंय. हे पर्यटनासाठीही सोयीचे होणाराय. पुणे- शिर्डी- नागपूर विमान सेवा येत्या शुक्रवारपासून सुरू करण्यात येणार आहे. तर पुणे- औरंगाबाद- नागपूर ही विमान सेवा एक मार्चपासून सुरू होणार आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिपक कपूर यांनी ही माहिती दिली.

अमरावतीच्या विमानतळासाठी केंद्राकडून साह्य

राज्यातील नवीन सेवा सुरू करण्यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अन्ड अग्रूकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ दीपक कपूर यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. शिर्डी येथे स्वतंत्र माल वाहतूक टर्मिनल उभारण्यात येणार आहे. अमरावती येथील विमानतळासाठी केंद्राकडून 52 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यात 6.5 कोटी रुपये मिळालेत. अमरावती विमानतळासाठी राज्याकडून 23 कोटी मिळणार आहेत. अशी माहितीही दीपक कपूर यांनी दिली. नोव्हेंबर 2022 पासून अमरावती विमानतळावरून प्रवासी विमानसेवा सुरू करण्याचा प्रयत्न आहे.

Nagpur Crime | पाच कोटी भेज दे नहीं तो उठा लुंगाँ, प्रफुल्ल गाडगे यांना दिलेल्या अपहरणाच्या धमकीने नागपुरात खळबळ

Video : Nagpur | भंगारवाल्याकडे शंभर आधार कार्ड; वीस रुपये द्या, आधारकार्ड घेऊन जा, नागपुरात नेमकं काय घडलं?

Yavatmal Crime | आर्णी तालुक्यात महामार्गावर लूटमार, मशीन चालकास झाडास बांधून मारहाण, पोलीस चौकी काय कामाची?