AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्व बिलं एका क्लिकवर, आधार पॅन अपडेटचीही सुविधा, ‘वेब नागपूर’चे राज्यपालांच्या हस्ते लोकार्पण

इंटरनेट सर्वसानान्यांच्या जीवनात गरजेची बाब बनली आहे. मग ते बिल भरायचं असोत की टॅक्स किंवा तिकीट काढणे, सर्वसामान्यांच्या अशा विविध गरजा एका क्लिकवर सोडवता याव्यात, म्हणून सायबर तज्ज्ञ अजित पारसे यांनी ‘वेब नागपूर’ ही वेबसाईट तयार केली आहे.

सर्व बिलं एका क्लिकवर, आधार पॅन अपडेटचीही सुविधा, 'वेब नागपूर'चे राज्यपालांच्या हस्ते लोकार्पण
अजित पारसे आणि भगतसिंह कोश्यारी
| Edited By: Akshay Adhav | Updated on: Oct 13, 2021 | 12:19 PM
Share

नागपूर : इंटरनेट सर्वसानान्यांच्या जीवनात गरजेची बाब बनली आहे. मग ते बिल भरायचं असोत की टॅक्स किंवा तिकीट काढणे, सर्वसामान्यांच्या अशा विविध गरजा एका क्लिकवर सोडवता याव्यात, म्हणून सायबर तज्ज्ञ अजित पारसे यांनी ‘वेब नागपूर’ ही वेबसाईट तयार केली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी या ‘वेब नागपूर’ या वेबसाईटचं लाँचिंग केलं. यावेळी राज्यपाल यांनी समाजहितासाठी सुरु केलेल्या या निःशुल्क वेबसाईटला शुभेच्छा दिल्या आणि अजित पारसे यांच्या उपक्रमाचं कौतुक केलं.

लहान मुलांच्या लसीकरणासाठी उपयुक्त वेबसाईट

नुकतंच 2 ते 18 वयोगटासाठी ‘कोव्हॅक्सिन’च या कोरोना लसीच्या आपात्कालीन वापराला ‘डीजीसीआय’ने मंजुरी दिलीय. त्यामुळे लवकरच लहान मुलांचं लसीकरण सुरु होणार आहे. नागपूर जिल्ह्यात लहान मुलांना लस कशी मिळेल? नोंदणी कुठे करायची, लसीकरण केंद्र कुठले आणि प्रशासनाचं आवाहन, याबाबतची सर्व माहिती ‘वेब नागपूर’ या वेबसाईटवर देण्यात येणार आहे.

एका क्लिकवर अनेक कामं

“भारतात ७४ कोटींच्या वर लोकं इंटरनेटचा वापर करतात, महाराष्ट्र आणि आपल्या नागपूरातंही ६० टक्क्यांपेक्षा जास्त लोक इंटरनेट वापरतात. त्यामुळे इंटरनेटच्या या जगात सर्वसामान्यांच्या रोजच्या गरजा ॲानलाईन सोडवता याव्यात, यात लाईट बिल भरणे, कर भरणे, तक्रार करणे, तिकीट काढणे, गॅस सिलिंडर बुक करणे यासारख्या गरजा एका क्लिकवर सोडवता याव्यात, म्हणुन ‘वेब नागपूर’ ही वेबसाईट नागपूरकरांच्या सेवेत लाँच केलीय.

सर्वसामान्यांना वेबसाईट वापरण्याचं प्रशिक्षण, ‘वेब नागपूर’ नावाचं कार्डही देणार

प्रत्येक नागपूरकरांनी आपल्या रोजच्या गरजांसाठी वापरता येणारी ही निःशुल्क वेबसाईट आहे. आज राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी ही वेबसाईट लाँच केल्याने, त्यांचे मी आभार मानतो” अशी भावना यावेळी सायबर तज्ज्ञ अजित पारसे यांनी व्यक्त केली. सर्वसामान्य नागपूरकरांना वेबसाईट वापरण्याचं प्रशिक्षण देण्यात येणार असून, ‘वेब नागपूर’ नावाचं कार्डंही देण्यात येणार आहे. असंही अजित पारसे यांनी सांगितलं.

वेबसाईटचं महत्त्व

केंद्र आणि राज्य सरकार सघ्या ॲानलाईन व्यवहारांना प्रोत्साहन देत आहे. नागपूर महानगरपालिका, जिल्हा प्रशासन आणि इतर सरकारी कार्यालयाने आपल्या बऱ्याच सेवा ॲानलाईन केल्या आहेत. पण बरेच लोक माहिती अभावी याचा लाभ घेत नाही. त्यामुळेच तळागळाळातल्या लोकांना ऑनलाई व्यवहार कळावे, रोजच्या जीवनात आपल्या गरजांसाठी इंटरनेटचा सहज वापर करता यावा, यासोबतच सर्वसामान्य नागपूरकरांनी ऑनलाईन सुविधांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, यासाठी ही वेबसाईट फायद्याची ठरेल असा विश्वास, त्यांनी केला जातो आहे.

हे ही वाचा :

व्हॉट्सअ‍ॅपचे नवे फीचर सायबर गुन्हेगारांच्या पथ्यावर, पुरावे मिटवण्याचे आयते कोलीत

Follow Us
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...