बच्चू कडू यांना अपघातानंतर तातडीने अमरावतीहून नागपूरला नेले; बच्चू कडू यांची पहिली प्रतिक्रिया काय?

सकाळी प्राथमिक उपचार झाल्यानंतर बच्चू कडू यांना पुढील उपचारासाठी नागपूरच्या न्यूरॉन हॉस्पिटलला शिफ्ट करण्यात आळं आहे. यावेळी त्यांच्या सोबत पत्नी नयना कडू होत्या.

बच्चू कडू यांना अपघातानंतर तातडीने अमरावतीहून नागपूरला नेले; बच्चू कडू यांची पहिली प्रतिक्रिया काय?
बच्चू कडू यांना अपघातानंतर तातडीने अमरावतीहून नागपूरला नेले
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jan 11, 2023 | 1:35 PM

 नागपूर: प्रहार संघटनेचे नेते, माजी मंत्री बच्चू कडू यांचा आज पहाटे रस्ता ओलांडताना अपघात झाला होता. या अपघातात बच्चू कडू यांच्या डोक्याला आणि पायाला जबर मार लागला आहे. त्यांच्या डोक्याला टाकेही पडले आहेत. बच्चू कडू यांच्यावर अमरावतीतील एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र, आता त्यांना नागपूरच्या रुग्णालयात नेण्यात आलं आहे. बच्चू कडू यांना नागपूरच्या रुग्णालयात का नेण्यात आलं? याची माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, माझी प्रकृती उत्तम आहे, असं बच्चू कडू यांच्याकडून सांगण्यात आलं आहे.

बच्चू कडू आज पहाटे साडे सहा वाजता रस्ता ओलांडत असताना त्याना दुचाकीने जोरदार धडक दिली. त्यामुळे बच्चू कडू डिव्हाडरवर जाऊन आदळले आणि त्यांच्या डोक्याला तसेच उजव्या पायाला जबर मार लागला. त्यामुळे त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी त्यांच्या डोक्याला टाकेही मारण्यात आले. त्यांच्या डोक्याला आणि पायाला बँडेजही करण्यात आले होते.

मात्र, सकाळी प्राथमिक उपचार झाल्यानंतर बच्चू कडू यांना पुढील उपचारासाठी नागपूरच्या न्यूरॉन हॉस्पिटलला शिफ्ट करण्यात आळं आहे. यावेळी त्यांच्या सोबत पत्नी नयना कडू होत्या. बच्चू कडू यांच्या अपघाताची माहिती मिळताच मंत्री प्रवीण पोटे यांनी रुग्णालयात येऊन बच्चू कडू यांची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

 

अपघातानंतर बच्चू कडू यांनी ट्विट करून आपल्या प्रकृतीची माहिती दिली आहे. आज सकाळी रस्ता क्रॉस करताना माझा अपघात झाला. माझी प्रकृती ठीक असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मला विश्रांतीची गरज आहे. कृपया सर्व हितचिंतकांना विनंती की, कोणीही भेटायला येऊ नये, असं बच्चू कडू यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, नागपूरमधील रुग्णालयात बच्चू कडू यांच्या पायाचा एक्सरे काढण्यात येणार आहे. तसेच आवश्यक त्या चाचण्या करण्यात येणार आहे. अपघातात पायाचे हाड तर फ्रॅक्चर झालेलं नाही ना? याची तपासणी करण्यात येणार असल्याचं सांगितलं जातं. मात्र, बच्चू कडू यांची प्रकृती स्थिर असून काळजी करू नये, असं बच्चू कडू यांच्या निकटवर्तीयांनी सांगितलं.