‘शेतकऱ्यांनी बैलपोळा साजरा करावा, मनसे शेतकऱ्यांसोबत’; दहिहंडी पाठोपाठ बैलपोळा साजरा करण्यावर मनसेची आक्रमक भूमिका

| Updated on: Sep 04, 2021 | 2:05 PM

राज्य सरकारनं दहीहंडी साजरी करु नका, असं आवाहन केल्यानंतरही मनसेनं आक्रमक भूमिका घेत मुंबईत दहीहंडी साजरी केली होती. विदर्भात बैलपोळा सणावर निर्बंध आणल्याने मनसे नेते संतप्त झाले आहेत.

‘शेतकऱ्यांनी बैलपोळा साजरा करावा, मनसे शेतकऱ्यांसोबत’; दहिहंडी पाठोपाठ बैलपोळा साजरा करण्यावर मनसेची आक्रमक भूमिका
मनसे
Follow us on

नागपूर: राज्य सरकारनं दहीहंडी साजरी करु नका, असं आवाहन केल्यानंतरही मनसेनं आक्रमक भूमिका घेत मुंबईत दहीहंडी साजरी केली होती. विदर्भात बैलपोळा सणावर निर्बंध आणल्याने मनसे नेते संतप्त झाले आहेत. निर्बंधानंतरंही सोमवारी बैलपोळा सण साजरा करण्याचा इशारा मनसेनं दिला आहे. ‘शेतकऱ्यांनी बैलपोळा साजरा करावा, मनसे शेतकऱ्यांसोबत’, मनसैनिक स्वत: गावात जावून बैलपोळा साजरा करणार असल्याची माहिती मनसे नेते राजू उंबरकर यांनी दिला आहे.

मनसेचा राज्य सरकारला इशारा

मनसेनं मेळावे, उद्घाटन कार्यकर्ता संमेलन चालतात, मग हिंदूंच्या सणावर बंदी का? असा सवाल उपस्थित केला आहे. मुंबईतील दहीहंडीप्रमाणे विदर्भात पोळा साजरा करण्यासाठी मनसे आक्रमक झाली आहे. नागपूरसह विदर्भातील बऱ्याच जिल्हयात शेतकऱ्यांच्या बैलपोळा सणावर निर्बंध घालण्यात आले आहेत. येत्या सोमवारी बैलपोळा साजरा करण्यावर मनसे ठाम असल्याचं राजू उंबरकर म्हणाले आहेत.

यंदा पोळा भरणार नाही, जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे जिल्ह्यात यंदा मोठा आणि तान्हा पोळा भरणार नाही, असे आदेश जिल्हाधिकारी विमला आर. यांनी जारी केले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पध्दतीने सण साजरा करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.पोळा सणाला ग्रामीण भागात विशेष महत्त्व असते. यानिमित्ताने ठिकाणी यात्रा मेळाव्याचे देखील आयोजन होते कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात मोठा पोळा व तान्हा पोळा सार्वजनिक रित्या साजरा करण्यास प्रतिबंध घालण्यात आले आहे. हे दोन्ही सण सार्वजनिकरीत्या साजरे झाल्यास कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्यामुळे प्रशासनाने मोठा पोळा व तान्हा पोळा सार्वजनिकरीत्या साजरा करण्यास प्रतिबंध घातला आहे.

हा सण घरीच साजरा करावा बैलांच्या मिरवणूका काढण्यात येऊ नये. आरती, पुजा व अन्य धार्मिक कार्यक्रमात गर्दी होणार नाही. तसेच ध्वनीप्रदुषनाच्या नियमांचे पालन करावे. बैलांची पुजा करतांना शारीरिक अंतर पाळणे, तोंडाला मास्क लावणे, सॅनिटायझरचा वापर करावा तसेच कोरोना विषाणु प्रादुर्भावासाठी शासनाने केलेल्या वेळोवेळी मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे जिल्हाधिकारी विमला आर. यानी कळविले आहे.

इतर बातम्या:

National Teachers Award 2021: राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराचं राष्ट्रपतींच्या हस्ते वितरण, महाराष्ट्राच्या दोन शिक्षकांचा सन्मान होणार

आम्ही समोरून कोथळा काढतो, पाठीत खंजीर खुपसत नाही; राऊतांचा चंद्रकांतदादांवर पलटवार

ज्यांचा मुख्यमंत्री, त्यांचं सरकार, आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या वर, NCP च्या बालेकिल्ल्यात संजय राऊतांची डरकाळी

MNS Nagpur Raju Umbarkar oppose restrictions on Bailpola celebrations of Nagpur Collector