नागपूर पोलीस हिंदुस्थानी भाऊला बजावणार नोटीस; आयुक्त म्हणतात, सहभागी विद्यार्थ्यांचाही शोध घेणार

दाखल गुन्ह्यात विकास फाटकला अटक होऊ शकते. असं नागपूर पोलीस आयुक्त अमितेश कुमार ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना म्हणाले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांचा शोध घेत आहेत.

नागपूर पोलीस हिंदुस्थानी भाऊला बजावणार नोटीस; आयुक्त म्हणतात, सहभागी विद्यार्थ्यांचाही शोध घेणार
पोलीस आयुक्त अमितेश कुमार
Follow us
| Updated on: Feb 02, 2022 | 2:41 PM

नागपूर : हिंदूस्तानी भाऊ ऊर्फ विकास फाटकच्या (Hindustani Bhau) अडचणी आणखी वाढणार आहेत. नागपुरात विद्यार्थ्यांनी बसची तोडफोड करून आंदोलनाला हिंसक वळण दिले. त्या घटनेत हिंदूस्थानी भाऊ आरोपी आहे. त्याला हजर होण्यासाठी पोलीस नोटीस बजावणार (The police will issue a notice) आहेत. दाखल गुन्ह्यात विकास फाटकला अटक होऊ शकते. असं नागपूर पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Commissioner of Police Amitesh Kumar) ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना म्हणाले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांचा शोध घेत आहेत. असंही पोलीस आयुक्त म्हणाले. परीक्षा ऑनलाईन घेण्यावरून विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. परंतु, बेकायदेशीर हे आंदोलन विद्यार्थ्यांना चिथावणी देऊन त्यांच्याकडून हिंसक कृत्य केले. या आरोपाखाली नागपूर पोलिसांनी विकास पाठक ऊर्फ हिंदुस्थानी भाऊविरुद्ध दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहे. या हिंदुस्थानी भाऊवर मुंबई पोलिसांनीही गुन्हे दाखल केले आहे. मुंबई पोलिसांची चौकशी संपल्यानंतर त्याला नागपूर शहर पोलिस अटक करतील, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली.

अजनी पोलिसांत गुन्हा दाखल

गुन्हा दाखल झालेल्या आरोपी हिंदुस्थानी भाऊने दहावी-बारावीच्या ऑफलाईन परीक्षा पद्धती संबंधाने सोशल मीडियावर चिथावणीखोर मॅसेज पाठवले. मुंबई, नागपूरसह राज्यातील अनेक विद्यार्थ्यांना भडकवले. यातून त्याने विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरून बेकायदा आंदोलन करण्यास प्रवृत्त केले. आरोपीच्या या कृतीमुळे अनेक ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती निर्माण झाली. अजनी पोलिसांनी आंदोलनासंदर्भात गुन्हाही दाखल केला आहे.

पुढचा काही काळ धोक्याचा?

आंदोलनादरम्यान अनेक ठिकाणी तोडफोडही झाली. कोरोनाचा धोका असताना जागोजागी गर्दी जमल्यामुळे संसर्गाचा धोका अधिक तीव्र झाला. या पार्श्‍वभूमीवर मुंबई पोलिसांनी विकास पाठक याला सोमवारी रात्री अटक केली. ज्या पद्धतीने सोमवारी चिथावणी देऊन आंदोलन करण्यात आले त्याचप्रमाणे पुन्हा पुढच्या काही तासात असेच उलट-सुलट मॅसेज पाठवून अफवा पसरवल्या जाऊ शकतात, अशी माहिती पोलिसांकडे आली आहे. या पार्श्‍वभूमीवर, पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी मंगळवारी रात्री विद्यार्थ्यांसोबत नागरिकांनाही आवाहन केले आहे.

नितेश राणेंचा जामीन अर्ज फेटाळला, पोलिसांच्या कारवाईबाबत भाजप-शिवसेना नेते आमनेसामने

Hindusthani Bhau : हिंदुस्थानी भाऊच्या सुटकेसाठी मुलांना एकत्रित जमण्याचे आवाहन, ऑडिओ क्लिप व्हायरल

Breaking : वारीस पठाण यांना इंदुरमध्ये काळं फासलं? पठाण यांनी दावा फेटाळला, मग नेमकं काय घडलं?

Non Stop LIVE Update
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण....
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण.....
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?.
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग.
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला.
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग.