AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नागपूर ZP पोटनिवडणूक : 16 जागांसाठी 106 अर्ज तर पंचायत समिती पोटनिवडणुकीच्या 31 जागांसाठी 168 अर्ज

या पोटनिवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी एकत्र लढणार आहे. तर शिवसेनेने स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे.

नागपूर ZP पोटनिवडणूक : 16 जागांसाठी 106 अर्ज तर पंचायत समिती पोटनिवडणुकीच्या 31 जागांसाठी 168 अर्ज
nagpur Zp
| Edited By: | Updated on: Jul 06, 2021 | 8:17 AM
Share

नागपूर : नागपूर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीच्या 16 जागांसाठी 106 अर्ज दाखल करण्यात आले आहेत. तर पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीच्या 31 जागांसाठी 168 अर्ज दाखल झाले आहेत. नागपूर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीत फूट पडल्याचं चित्र आहे. त्यामुळे या पोटनिवडणुकीत शिवसेना, भाजप आणि आघाडी अशी तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. (Nagpur ZP by-election 106 applications for 16 seats and 168 applications for 31 Panchayat Samiti by-elections)

नागपूर ZP पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल

नागपूर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीच्या 16 जागांसाठी 106 अर्ज दाखल झाले आहेत. तर तर पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीच्या 31 जागांसाठी 168 अर्ज दाखल झाले आहेत. या पोटनिवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी एकत्र लढणार आहे. तर शिवसेनेने स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे.

नागपूर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीसाठी भाजपचे विरोधी पक्षनेते अनिल बिधान यांचे तिकीट तापले आहे. अनिल बिधान यांनी बंडखोरी करत आपला अर्ज दाखल केला होता. तर काँग्रेसने ज्योती राऊत यांना डच्चू दिला आहे. त्यामुळे या निवडणुकीसाठी कोणला संधी मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

नागपुरात तिरंगी लढत

नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी करण्याबाबतच्या प्रस्तावाला उत्तर न दिल्यामुळे शिवसेनेने स्वबळाचा नारा दिला आहे. याआधी काँग्रेस-राष्ट्रवादीने एकत्र लढण्याची घोषणा स्थानिक पातळीवर केली होती. त्यामुळे सेना, भाजप आणि आघाडी अशी तिरंगी लढत नागपुरात पाहायला मिळणार आहे.

शिवसेनेच्या प्रस्तावाला उत्तर नाही

नागपूर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीतही महाविकास आघाडी पॅटर्न राबवण्याचा प्रस्ताव स्थानिक शिवसेनेने राष्ट्रवादीला दिला होता. मात्र राष्ट्रवादीने शिवसेनेच्या प्रस्तावाला कोणतंही उत्तर दिलं नसल्याची माहिती आहे. त्यामुळे शिवसेनेने स्वबळावर लढण्याची घोषणा केली. नागपूर जिल्हा परिषदेच्या 16 तर पंचायत समितीच्या 61 जागांवर पोटनिवडणूक होणार आहे.

“म्हणून शिवसेना स्वबळावर लढणार”

शिवसेना स्वबळावर लढणार असल्याची माहिती शिवसेना आमदार आशिष जैसवाल यांनी दिली. “कार्यकर्त्यांना संधी मिळावी म्हणून सेना स्वबळावर पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे” असं आशिष जैसवाल यांनी सांगितलं. त्यामुळे आगामी पोटनिवडणुकीत शिवसेना विरुद्ध भाजप विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी असं चित्र पाहायला मिळणार आहे.

नागपुरातच पटोलेंच्या घोषणेला बगल

दुसरीकडे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या स्वबळाच्या घोषणेनंतरही नागपुरात काँग्रेस-राष्ट्रवादीने हातात हात धरला आहे. नागपूर जिल्हा परिषदेत दोन्ही पक्ष एकत्र पोटनिवडणूक लढवण्याबाबत शिक्कामोर्तब झालं. दोन्ही पक्षात जागावाटपासाठी सार्वत्रिक निवडणुकीचा फॉर्म्युला वापरण्यात येणार आहे.

(Nagpur ZP by-election 106 applications for 16 seats and 168 applications for 31 Panchayat Samiti by-elections)

संबंधित बातम्या : 

नागपूर ZP पोटनिवडणूक : काँग्रेसशी सूत, शिवसेनेचा प्रस्ताव अनुत्तरित, राष्ट्रवादीच्या पवित्र्यानंतर सेनेचा मोठा निर्णय

नागपूर ZP आणि पंचायत समितीसाठी काँग्रेसची मोर्चेबंधणी, इच्छूक उमेदवारांची यादी तयार

स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणूक काँग्रेस स्वबळावरच लढणार, नाना पटोलेंचा पुनरुच्चार

Follow Us
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...