नितीन गडकरी यांनी भाषणात नातवाच्या फोटोचा संदर्भ दिला ‘तो’ फोटो जगभरात का झालेला व्हायरल, जाणून घ्या कारण!

काही दिवसांपूर्वी नितीन गडकरींच्या नातवाचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. गडकरींनी परत एकदा नातवाचा फोटाचा संदर्भ आपल्या भाषणात दिल्याने फोटो नेमका व्हायरल झाला होता असा काहींना प्रश्न पडला असावा.

नितीन गडकरी यांनी भाषणात नातवाच्या फोटोचा संदर्भ दिला ‘तो’ फोटो जगभरात का झालेला व्हायरल, जाणून घ्या कारण!
Follow us
| Updated on: Jul 06, 2023 | 10:37 PM

नागपूर : केंद्रामधील रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी कायम चर्चेत असतात. देशातील रस्त्यांची कामं पाहून विरोधी पक्षातील नेतेही गडकरी यांचं तोंडभरून कौतुक करतात. नितीन गडकरींनी देशातील महामार्गांचा चेहरामोहरा बदललून टाकला आहे. नितीन गडकरी भाषणाला उभे राहिले की चौफेर फटकेबाजी करतात. काही दिवसांपूर्वी नितीन गडकरींच्या नातवाचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. गडकरींनी परत एकदा नातवाचा फोटाचा संदर्भ आपल्या भाषणात दिल्याने फोटो नेमका व्हायरल झाला होता असा काहींना प्रश्न पडला असावा.

शिक्षणसोबत समाजशास्त्र सुद्धा महत्वाचं आहे सुशिक्षित होणं चांगलं आहे पण त्यासोबत सुसंस्कृत सुद्धा होणे गरजेचे आहे. मी माझ्या मुलांना शिक्षण संस्कारी शाळेत दिलं त्यामुळे नमस्कार करताना ते वाकून करतात. माझ्या नातवाने सुद्धा राजनाथ सिंग यांना तसाच नमस्कार केला त्याचा फोटो जगभरात वायरल झाला असल्याचं नितीन गडकरी म्हणाले.

नितीन गडकरी यांच्या नातवाने संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांना वाकून नमस्कार केला होता. तेव्हा त्यांच्या नातवाचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल  झालेला पाहायला मिळाला होता. विद्यापीठ शिक्षण मंच द्वारा आयोजित गुरुवंदना एवम सत्कार समारंभ कार्यक्रमात ते भाषण करत होते.

काय म्हणाले नितीन गडकरी?

नगरसेवक विचार करतो मी आमदार कसा होईल, आमदार विचार करतो मी मंत्री कसा होईल, मंत्री विचार करतो पुढे माझं काय होईल पुन्हा मंत्री होण्यासाठी तो सूट तयार ठेवतो. कारण समाधान नाही, म्हणून आपण समाधानी असलं पाहिजे. मला जे मिळालं ते माझ्या कॅपिसिटी पेक्षा जास्त मिळालं असा विचार केला पाहिजे असंही नितीन गडकरी म्हणाले.

गुरुपौर्णिमेला आणि गुरू शिष्य परंपरेला आपल्या संस्कृतीत मोठ महत्व आहे. या ठिकाणी अनेक गुरू बसले आहे जे विध्यार्थी घडवण्याचा काम करत आहे. 18 वर्ष जुन्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचं काम सुरू करण्यात आलं यापासून बायो गॅस बनवला जाणार आहे. त्याचप्रमाणे विध्यार्थी कितीही कचरा असला तरी त्याला संपत्ती बनविण्याचा गुरुची भूमिका असते.त्याच मिशनने गुरूने काम केलं तर प्रत्येक विध्यार्थी सोनं बनू शकत असल्याचं गडकरी म्हणाले.

अहंकार आणि इगो या दोन शब्दात फरक आहे मात्र याला दूर ठेवले पाहिजे. नॉलेज महत्वाचं आहे मात्र त्यातील स्पिरिट समजून घेण्याची गरज आहे. स्पिरीट काय असते हे विध्यार्थ्यांना समजलं पाहिजे. धर्माचा अर्थ कर्तव्य आहे हा शब्द आहे मात्र त्याचे वेगवेगळे अर्थ काढतात. शिक्षकांचा धर्म हा महत्वाचा धर्म असल्याचंही गडकरी यांनी म्हटलं आहे.

Non Stop LIVE Update
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.
जाहीरपणे धमक्या? ही भाषा तुम्हाला शोभते का? राऊतांचा दादांवर घणाघात
जाहीरपणे धमक्या? ही भाषा तुम्हाला शोभते का? राऊतांचा दादांवर घणाघात.
48 तासात उत्तर द्या, अन्यथा... निवडणूक अधिकाऱ्याकडून पुन्हा नोटीस
48 तासात उत्तर द्या, अन्यथा... निवडणूक अधिकाऱ्याकडून पुन्हा नोटीस.
भांडूपमध्ये मध्यरात्री कोट्यवधींची रोकड सापडली, भरारी पथकाची कारवाई
भांडूपमध्ये मध्यरात्री कोट्यवधींची रोकड सापडली, भरारी पथकाची कारवाई.
मला शरम वाटली असती, असे म्हणत अजितदादांकडून सुप्रिया सुळेंची मिमिक्री
मला शरम वाटली असती, असे म्हणत अजितदादांकडून सुप्रिया सुळेंची मिमिक्री.
उत्तर मध्य मुंबईत भाजपनं उमेदवार बदलला, पूनम महाजनांचा पत्ता कट
उत्तर मध्य मुंबईत भाजपनं उमेदवार बदलला, पूनम महाजनांचा पत्ता कट.
गडी आपल्यात आला पाहिजे, नाहीतर घाबरून...,सदाभाऊंचं ईडीसंदर्भातील विधान
गडी आपल्यात आला पाहिजे, नाहीतर घाबरून...,सदाभाऊंचं ईडीसंदर्भातील विधान.