नागपुरात शिवसैनिकांचं जोरदार आंदोलन, भाजयुमोकडूनही घोषणाबाजी, नेमकं काय घडतंय?

नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा चिपळूणमध्ये सुरु झाल्यानंतर भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमने सामने आले.

नागपुरात शिवसैनिकांचं जोरदार आंदोलन, भाजयुमोकडूनही घोषणाबाजी, नेमकं काय घडतंय?
नागपूर शिवसैनिकांचं आंदोलन
Follow us
| Updated on: Aug 24, 2021 | 1:10 PM

नागपूर: नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा चिपळूणमध्ये सुरु झाल्यानंतर भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमने सामने आले. नाशिक, मुंबई, पुणे, सांगली, ठाणे पाठोपाठ नागपूरमध्ये देखील शिवसैनिक आक्रमक झालेले पाहायला मिळाले. नागपूरच्या धंतोली येथील भाजपच्या विभागीय कार्यालयाबाहेर शिवसेना कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. नारायण राणे यांच्या विरोधात शिवसेना कार्यकर्त्यांनी जोरादर घोषणाबाजी करण्यात आली.

पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

नागपुरातील धंतोली येथील भाजपच्या विभागीय कार्यालयासमोर लागला पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांच्यावतीनं बंदोबस्त ठेवण्यात आला होता.राज्यात घडत असलेल्या घटना बघता पोलिसांनी तयारी करत बंदोबस्त ठेवला होता.

शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी

नागपूरमध्ये शिवसैनिंकानी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी शिवसैनिक कोंबड्या हातात घेऊन आंदोलनात सहभागी झाले होते..

भाजपयुमोकडून घोषणाबाजी

भाजपच्या नागपूर विभागीय कार्यालयासमोर भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ता जमा झाले होते. युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी भारत माता की जयच्या घोषणा दिल्या आहेत. भाजपच्या कार्यालयासमोर कोणी शिव सैनिक येऊ नये यासाठी भाजपचे कार्यकर्ते जमा झाले होते. भाजयुमोकडून शिवसैनिकांविरोधात जोरदार घोषणा बाजी करण्यात आली.

मुंबईत युवा सेना आक्रमक

मुंबईत युवासेना सरचिटणीस वरुण सरदेसाई यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहू येथील निवासस्थानासमोर आंदोलन केलं. मोठ्या संख्येनं शिवसैनिक आणि युवा सैनिक राणेंच्या घरासमोर जमा झाल्यानं तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी युवा सैनिकांना पांगवण्यासाठी बळाचा वापर करुन लाठीमार केला. उद्धव ठाकरे आमच्यासाठी देव आहेत. उद्धव ठाकरे यांच्या विरोधात नारायण राणे यांनी केलेल्या भाष्यावरुन युवा सैनिक आक्रमक झालेले पाहायला मिळाले.

नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राज्यातील शिवसैनिक आक्रमक झालेले आहेत. नाशिक, सांगली, नागपूर, मुंबई, पुणे येथे शिवसेना कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. चिपळूणमध्ये शिवसैनिकांनी नारायण राणे यांच्या स्वागतासाठी लावलेले पोस्टर्स फाडून टाकले.

इतर बातम्या:

तुमच्या घरासमोर उभे आहोत, तुम्ही काय केलंत; राणेंच्या घरासमोर उभं राहून वरुण सरदेसाईंचं ओपन चॅलेंज

Narayan Rane | चिपळूणमध्ये शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने

Shivsena and BJYM party workers protest on roads on Nagpur over Narayan Rane statement on Uddhav Thackeray

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.