तुमच्या घरासमोर उभे आहोत, तुम्ही काय केलंत; राणेंच्या घरासमोर उभं राहून वरुण सरदेसाईंचं ओपन चॅलेंज

मुंबईत युवासेना सरचिटणीस वरुण सरदेसाई यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहू येथील निवासस्थानासमोर आंदोलन केलं. मोठ्या संख्येनं शिवसैनिक आणि युवा सैनिक राणेंच्या घरासमोर जमा झाल्यानं तणाव निर्माण झाला होता.

नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा चिपळूणमध्ये सुरु झाल्यानंतर भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमने सामने आले. तर, मुंबईत युवासेना सरचिटणीस वरुण सरदेसाई यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहू येथील निवासस्थानासमोर आंदोलन केलं. मोठ्या संख्येनं शिवसैनिक आणि युवा सैनिक राणेंच्या घरासमोर जमा झाल्यानं तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी युवा सैनिकांना पांगवण्यासाठी बळाचा वापर करुन लाठीमार केला. उद्धव ठाकरे आमच्यासाठी देव आहेत. उद्धव ठाकरे यांच्या विरोधात नारायण राणे यांनी केलेल्या भाष्यावरुन युवा सैनिक आक्रमक झालेले पाहायला मिळाले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI