नागपूर-बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक, कुठे घडली ही घटना?

| Updated on: Dec 16, 2022 | 10:57 AM

नुकतेच पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनवर दगडफेक केल्याची घटना समाेर आली आहे.

नागपूर-बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक, कुठे घडली ही घटना?
वंदे भारत एक्सप्रेस
Image Credit source: Social Media
Follow us on

नागपूर, छत्तीसगडमध्ये नुकत्याच सुरू झालेल्या नागपूर-बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) ट्रेनच्या खिडकीवर अज्ञात व्यक्तीने दगडफेक (Stone pelting) केल्याची घटना समाेर आली आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (SECR) च्या रायपूर विभागांतर्गत दुर्ग आणि भिलाई नगर रेल्वे स्थानकांदरम्यान ही सेमी हाय स्पीड ट्रेन राज्यातील बिलासपूरला जात असताना बुधवारी संध्याकाळी ही घटना घडल्याचे रेल्वे अधीकऱ्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी झाले हाेते लाेकार्पण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी या गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला हाेता. महाराष्ट्रातील नागपूर आणि छत्तीसगडमधील बिलासपूर दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन, देशातील सहावी सेवा आहे.

अज्ञात ईसमाने ट्रेनवर दगडफेक केली, ज्यामुळे काल संध्याकाळी E1 कोचच्या खिडकीचे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही, असे अधिकारी म्हणाले. रेल्वे प्रोटेक्शन फोर्सला (आरपीएफ) याची माहिती देण्यात आली आणि  घटनेची चौकशी सुरू करण्यात आली, असेल्याचे अधिकाऱ्यांनी सांगीतले.

यासाठी विषेश आहे वंदेभारत एक्सप्रेस

नागपूर-बिलासपूर मार्गावर धावणारी ही एक्सप्रेस  सुमारे 130 किमी प्रतितास वेगाने या मार्गावर 412 किलोमीटरचे अंतर कापते. नागपूर, गोंदिया, राजनांदगाव, दुर्ग, रायपूर आणि बिलासपूर येथे 6 थांब्यांसह हे अंतर कापण्यासाठी ट्रेनला 5 तास 30 मिनिटे लागतात.

1128 प्रवासी वाहून नेण्याची क्षमता असलेले या एक्सप्रेसमध्ये 16 चेअर-कार कोच आहेत. याशिवाय ही ट्रेन अनेक वैशिष्ट्यांनी परीपूर्ण आहे, तसेच प्रवाशांच्या सुरक्षेसाठी, अनेक सुविधांसह त्यात कॅमेरे आहेत.

नागपूर-बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन ही महाराष्ट्रातील दुसरी आणि भारतातील सहावी ट्रेन आहे. याआधी भारतात विविध मार्गावर 5 गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत.

देशातील पहिली सेमी-हाय-स्पीड रेल्वे कानपूर आणि अलाहाबादलाही सेवा पुरवते. दुसरी वंदे भारत ट्रेन दिल्ली आणि श्री वैष्णो देवी माता, कटरा दरम्यान सुरू करण्यात आली. मुंबई ते गांधीनगर दरम्यान तिसरी ट्रेन धावते. हिमाचल प्रदेशातील उना ते नवी दिल्ली असा प्रवास करणारी चौथी वंदे भारत एक्सप्रेस आहे.