Nagpur NMC | दिव्यांगांच्या उत्थानासाठी विविध योजना, पात्र लाभार्थ्यांना लाभ; जाणून घ्या काय आहेत योजना

| Updated on: Feb 02, 2022 | 9:00 AM

नागपूर महापालिकेद्वारे शहरातील दिव्यांगांच्या उत्थानासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा शहरातील सर्व पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळावा यासाठी तातडीने या योजनांची अंमलबजावणी करा, असे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले.

Nagpur NMC | दिव्यांगांच्या उत्थानासाठी विविध योजना, पात्र लाभार्थ्यांना लाभ; जाणून घ्या काय आहेत योजना
नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी आणि पदाधिकारी.
Follow us on

गोविंदा हटवार

नागपूर : शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या दिव्यांगांच्या योजनांचा (Disability schemes) नागपूर शहरातील लाभार्थ्यांना मिळालेला लाभ आणि प्रलंबित असलेली प्रकरणे या सर्व बाबींचा मंगळवारी महापौर दयाशंकर तिवारी (Mayor Dayashankar Tiwari) यांनी आढावा घेतला. राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्या दिव्यांग खेळाडूंना आर्थिक सहाय्य देण्यात येते. अंत्योदय योजने अंतर्गत दिव्यांगांना ई-रिक्षा वाटप, मोटोराईज ट्रायसिकल या सर्व योजना आहेत. कर्णबधिर दिव्यांगांना शस्त्रक्रियेकरिता अर्थसहाय्य (Surgery funding) या योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात राज्य शासनाचे परिपत्र आहे. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना सहा लाख रुपये सहाय्य करण्याची तरतूद आहे. या योजनेचा गरजूंना लाभ मिळावा. त्यांना लवकर उपचार घेता यावे यासाठी ही योजना नियमांच्या अधीन राहून खासगी रुग्णालयांमध्येही लागू करण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे. दिव्यांगांना वैयक्तिक स्वयंरोजगाराकरिता एक लाख रुपये आर्थिक सहाय्य मनपातर्फे करण्यात येणार आहे. हे सहाय्य दोन टप्प्यांमध्ये पात्र लाभार्थ्यांना करण्यात यावे. याशिवाय योजनेचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यामार्फत मिळालेल्या अर्थसहाय्याचा योग्य वापर होत आहे अथवा नाही. याची शहानिशा करण्यासाठी प्रशासकीय स्तरावर यंत्रणा तयार करण्याचेही महापौरांनी निर्देश दिले. प्रत्येक झोनमध्ये नियुक्त समूह संघटकांद्वारे झोनस्तरावर दिव्यांगांचे किमान एक बचतगट तयार करण्यात आला. त्या मार्फत त्यांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य करण्यात येईल.

मतीमंत घटकातील दिव्यांगांना निर्वाह भत्ता

मतीमंत घटकातील दिव्यांगांना निर्वाह भत्ता देण्यासंदर्भात सहा लाभार्थ्यांची यादी विभागाकडे प्राप्त झाली आहे. त्यांना लवकरच योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त दीपककुमार मीना यांनी यावेळी दिली. दिव्यांगांच्या शिष्यवृत्ती संदर्भात शिक्षणाधिकाऱ्यांशी समन्वय साधून याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले. स्मार्ट सिटीतर्फे दिव्यांगांना ई-रिक्षा देण्यात येणार आहेत. यासंदर्भात स्मार्ट सिटीशी समन्वय साधण्यात येणार आहे. पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करून त्यांना ई-रिक्षा लवकरात लवकर प्रदान करण्यात याव्यात यासंदर्भात कार्यवाही करण्यात येईल.

पीएम आवास योजनेचे अर्थसाह्य

प्रधानमंत्री आवास योजना घटक क्रमांक तीन अंतर्गत मनपा, नासुप्र व म्हाडातर्फे बांधण्यात येतात. बांधकामाकरिता सोडत पद्धतीने दिव्यांग लाभार्थ्यांची निवड केली जाते. शासन अनुदान अडीच लाख रुपये वजा करून उर्वरित रक्कमेच्या पन्नास टक्के अर्थसहाय्य योजनेबाबत कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. पात्र लाभार्थ्यांना येत्या काही दिवसांत योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली. महिला व बालकल्याण समितीच्या अंतर्गत समाजविकास विभागाद्वारे शिलाई मशीन देण्याबाबत कार्यवाही करण्याबाबत महिला व बालकल्याण समिती सभापती दिव्या धुरडे यांनी यावेळी सूचना केली. कोरोनामुळे मृत पावलेल्या कुटुंबीयांना प्राधान्याने शिवणयंत्र देण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले.

तब्बल सहा महिन्यांनंतर मिळणार विद्यार्थ्यांना पोषण आहार; नागपूर जिल्ह्यातील किती विद्यार्थ्यांना होणार लाभ?

कुत्रं पाळायचंय! या आणि देशी कुत्र्याचं पिल्लू घेऊन जा; प्राणीमित्र संघटनेचा दत्तक देण्याचा उपक्रम

सतीश उके, प्रदीप उके यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा, प्रकरण काय? एकेकाळी मांडली फडणवीसांविरोधात बाजू