Nagpur Industry | नागपुरातील उद्योगांचे चाळीस टक्के उत्पादन ठप्प; व्यावसायिकांचे कसे होतेय नुकसान?

आधी कोरोनामुळं व्यवसाय बंद होते. आता इंधानाचे दर वाढलेत. कच्च्या मालावरही याचा परिणाम झाला. त्यामुळं नागपूर जिल्ह्यातील सुमारे चाळीस टक्के उद्योगांचे उत्पादन ठप्प झालंय.

Nagpur Industry | नागपुरातील उद्योगांचे चाळीस टक्के उत्पादन ठप्प; व्यावसायिकांचे कसे होतेय नुकसान?
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Feb 02, 2022 | 5:08 AM

नागपूर : कोरोनानंतरच्या काळात इंधनाचे दर वाढलेत(Fuel prices rose). पेट्रोल आणि डिझेलच्या भावात विक्रमी वाढ झाली. याचा परिणाम कच्च्या मालाच्या भावावरही झाला. सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांवर (Micro, small and medium enterprises) याचा परिणाम झालाय. कोरोनापूर्वीचा काळ आणि आताचा काळ यात खूप फरक पडला. उत्पादन खर्च वाढल्याने वस्तूंच्या किमती वाढवाव्या लागल्यात. परंतु, वाढीव दराने खरेदी करणारे तयार नाहीत. त्यामुळे उद्योजकांनी उत्पादन कमी केले. चाळीस टक्के उत्पादन ठप्प झाले. तसेच पुरवठा केलेल्या मालाची बिलेही राष्ट्रीयकृत संस्थांकडून (Nationalized Institutions) मिळत नाहीत. हीच परिस्थिती शासकीय संस्थाची आहे. हे दुखणं कुणाला सांगावं, असं उद्योजकांचं म्हणण आहे.

उद्योगांना लागली उतरती कळा

आता पुरवठा साखळी खंडित झाली आहे. उद्योजकांकडे असलेल्या ठेवी आता संपत आल्या आहेत. बँकांची वसुली मात्र सुरू आहे. व्याजाचे दर काही कमी होत नाहीत. कामगारांचे पगार द्यावेच लागतात. इंधन दरवाढीमुळं वाहतूक खर्च वाढला. त्यामुळं उद्योगांना उतरती कळा लागली आहे, अस मत एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रशेखर शेगावकर यांनी केली आहे.

नवीन आर्डर मिळणे कठीण

बुटीबोरी इंडस्ट्रीज असोसिएशनचे माजी अध्यक्ष नितीन लोणकर म्हणाले, कच्चा मालाचे दर वाढलेत. उद्योगांना काही सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या जुन्याच दरात काम करण्याची सक्ती करीत आहेत. ते परवडणारे नाही. नवीन ऑर्डर मिळणे कठीण झालेले आहे. परिणामी उद्योग अडचणीत सापडलेले आहेत. त्यामुळं हे दुखणं कुणाला सांगणार, असंही ते म्हणाले. नवीन ऑर्डर मिळत नसल्यानं मालाचे उत्पादन काढता येत नाही. जुनी वसुली होत नाही, अशा अनेक अडचणी उद्योजकांपुढं आहेत.

तब्बल सहा महिन्यांनंतर मिळणार विद्यार्थ्यांना पोषण आहार; नागपूर जिल्ह्यातील किती विद्यार्थ्यांना होणार लाभ?

कुत्रं पाळायचंय! या आणि देशी कुत्र्याचं पिल्लू घेऊन जा; प्राणीमित्र संघटनेचा दत्तक देण्याचा उपक्रम

सतीश उके, प्रदीप उके यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा, प्रकरण काय? एकेकाळी मांडली फडणवीसांविरोधात बाजू

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.