AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bhandara | शिकारीसाठी गेले आणि वनविभागाच्या जाळ्यात आले, भंडाऱ्यात चौदा जणांवर कारवाई

नुकत्याच झालेल्या वाघाच्या शिकारीमुळं वनविभाग सतर्क झालंय. शिकाऱ्यांवर बारीक नजर ठेवली जात आहे. लाखांदूर तालुक्यातील रोहनी येथील शेतशिवारात चौदा शिकाऱ्यांना अटक करण्यात आली.

Bhandara | शिकारीसाठी गेले आणि वनविभागाच्या जाळ्यात आले, भंडाऱ्यात चौदा जणांवर कारवाई
लाखांदूर वनविभागाने अटक केलेल्या आरोपींसह शिकाऱ्यांचे जप्त केलेले साहित्य.
| Edited By: | Updated on: Feb 01, 2022 | 3:50 PM
Share

तेजस मोहतुरे 

भंडारा : लाखांदूर वन परिक्षेत्रातील घनदाट अरण्य आहे. या जंगलात विविध प्रजातींचे जंगली पक्षी (Wild birds of the species) आहेत. वनक्षेत्राजवळील गावातील काही शिकारी टोळ्या सक्रिय (Hunting gangs active) झाल्यात. या भागात दुर्मिळ पक्ष्यांची शिकार केली जाते. अशाच प्रकारची घटना उघडकीस आले. रात्री वन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी (Forest officers and staff) घटना स्थळावर सापळा रचला होता. रात्री साडेनऊच्या सुमारास शिकाऱ्यांच्या दुचाकी रोहनी – पाऊनगाव रस्त्यावर ठेवलेल्या दिसल्या. मोटारसायकलींजवळ शिकारी शिकार करून आल्यानंतर वन विभागाच्या पथकाने त्यांच्यावर धाड टाकली. या धाडीत त्यांच्याजवळ 1972 मधील अनुसूची चारमधील कॉलर डॉव (कवळ्या) 42 जीवंत तीन मृत, ब्राम्हणी स्टॅलिंग (मोठी मैना) दोन व लहान मैना एक मृत जप्त करण्यात आली. तसेच शिकारीसाठी वापरण्यात आलेले नायलॉन जाळे तीन बास हस्तगत करण्यात आले. याशिवाय सहा दुचाकी व पाच मोबाईल जप्त करून चौदा शिकाऱ्यांना अटक करण्यात वन विभागास यश आले.

यांनी केली आरोपींविरोधात कारवाई

आरोपींविरुद्ध वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 अंतर्गत वन्यजीव अपराधाची नोंद करण्यात आली. उपवन संरक्षक एस. बी. भलावी, साकोलीचे सहाय्यक वनसंरक्षक आरती राठोड यांचे मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी रूपेश गावित तपास करीत आहेत. क्षेत्र सहाय्यक आय. जी. निर्वाण , जी. डी. हात्ते, एम. ए. भजे , पी. बी. ढोले, एस. जी. खंडागळे, बी. एस. पाटील, आर. ए. मेश्राम, प्रफुल्ल राऊत, पोलीस पाटील नंदकिशोर मेश्राम तसेच वन मजूर विकास भुते यांनी कारवाई केली.

पक्ष्यांची केली होती शिकार

लाखांदूर वनपरिक्षेत्रातील तिरखुरीजवळ रोहनी शेत शिवार आहे. या भागात दुर्मिळ जंगली पक्ष्यांची शिकार करणारे सक्रिय झाल्याची माहिती वनविभागाला मिळाली. त्यांनी शिकाऱ्यांकडून कॉलर डॉव (कवड्या) 45, ब्राम्हणी स्टॅलिंग (मोठी मैना) तीन तसेच शिकारीसाठी वापरलेले साहित्य जप्त केले. यामध्ये सहा मोटारसायकल आणि पाच मोबाईल हँडसेटचा समावेश आहे.

तब्बल सहा महिन्यांनंतर मिळणार विद्यार्थ्यांना पोषण आहार; नागपूर जिल्ह्यातील किती विद्यार्थ्यांना होणार लाभ?

कुत्रं पाळायचंय! या आणि देशी कुत्र्याचं पिल्लू घेऊन जा; प्राणीमित्र संघटनेचा दत्तक देण्याचा उपक्रम

सतीश उके, प्रदीप उके यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा, प्रकरण काय? एकेकाळी मांडली फडणवीसांविरोधात बाजू

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.