मेहुण्याची मालमत्ता जप्त झाल्याने ‘मातोश्री’च्या दारे-खिडक्या हलू लागल्या, राऊतांना सावजीचा रस्सा झोंबला; Anil Bonde यांचा घणाघात

| Updated on: Mar 23, 2022 | 2:11 PM

शिवसेना संपर्क अभियानासाठी खासदार संजय राऊत तीन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. राऊत हे नागपुरात अस्वस्थ वाटले. चेहराही पडलेला दिसला. याचं कारण सावजी रस्स्याची कमाल तर नाही, राऊतांना सावजीचा रस्सा झोंबला, असा खरपूस समाचार माजी मंत्री डॉ. अनिल बोंडे ( Anil Bonde) यांनी घेतला. मेहुण्याची मालमत्ता जप्त झाल्याने 'मातोश्री'च्या दारे-खिडक्या हलू लागल्या, असंही बोंडे म्हणाले.

मेहुण्याची मालमत्ता जप्त झाल्याने मातोश्रीच्या दारे-खिडक्या हलू लागल्या, राऊतांना सावजीचा रस्सा झोंबला; Anil Bonde यांचा घणाघात
संजय राऊत आणि अनिल बोंडे
Image Credit source: tv 9
Follow us on

नागपूर : नागपुरात संजय राऊत अस्वस्थ वाटले, आणि चेहराही पडला दिसला. कदाचित सावजीच्या रस्स्याची कमाल वाटते. सावजी ही नागपूरच्या खाद्यपदार्थाची विशेषता आहे. सावजीचा रस्सा (Savji’s gravy) चांगलाच झोंबतो. सावजीचा रस्सा खाल्ल्यावर झोंबतो आणि सकाळी उठल्यावर हात धुवायच्या वेळेस विशेष करून झोंबतो, याची आठवण माजी मंत्री डॉ. अनिल बोंडे ( Anil Bonde) यांनी करून दिली. बोंडे म्हणाले, ईडीने मुख्यमंत्र्यांच्या मेव्हण्याची संपत्ती अटॅच केल्याने मातोश्रीचे दरवाजे खिडक्या हालायला लागल्या. मातोश्री पर्यंत ईडी पोहोचली. म्हणून मुख्यमंत्री अस्वस्थ वाटले. आज शिवसेनेच्या आमदारांना जेवायला बोलावलं. मुख्यमंत्र्यांच्या मेव्हण्यावर ईडीची कारवाई याचा शिवसंपर्क (Shivsampark) अभियानाशी काहीही संबंध नाही, असंही बोंडे यांनी स्पष्ट केलं.

कोण कधी आत जाईल

शिवसेना संपर्क अभियानासाठी खासदार संजय राऊत तीन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. राऊत हे नागपुरात अस्वस्थ वाटले. चेहराही पडलेला दिसला. याचं कारण सावजी रस्स्याची कमाल तर नाही, राऊतांना सावजीचा रस्सा झोंबला, असा खरपूस समाचार माजी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी घेतला. मेहुण्याची मालमत्ता जप्त झाल्याने ‘मातोश्री’च्या दारे-खिडक्या हलू लागल्या, असंही बोंडे म्हणाले. अनिल बोंडे म्हणाले, संपर्क अभियान करा की घरात बसून राहा. मुख्यमंत्री संपर्क कराला निघालेच नाही. यांना सातत्याने भीती वाटते की कधी कोण आत जाईल.

पापाचे भूत शांत झोपू देत नाही

राज्य सरकार केव्हा पडेल से सांगू शकत नाही. पण लोकांना आता हे सरकार नको आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांना केलेल्या पापाचे भुतं शांतपणे झोपू देत नाही, असा घणाघातही बोंडे यांनी केला. संजय राऊत यांच्याकडे ईओडब्लू आहे. त्यांनी आरोप केले त्यावर काहीही कारवाई झाली नाही. हे सरकार ताबोडतोब पडावं, असं लोकांना वाटतं. सरकार पडलं तर लोकं सुटकेचा श्वास घेतील.

Amravati | पलंग-गादी पाठवतो आराम करा नि राजीनामा द्या, भाजप नेते डॉ. अनिल बोंडे यांची नवाब मलिकांवर टीका

Chandrapur | जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा, बँकेच्या सीबीआय चौकशीची मागणी, पालकमंत्री वडेट्टीवार-खासदार धानोरकर समोरासमोर

ठाकरे सरकारमध्ये मतभेद आहेत काय?, Sanjay Raut यांनी पहिल्यांदाच दिली कबुली; नेमकं काय म्हणाले?