महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था राहिली नाही, नाना पटोले यांची सरकारवर थेट टीका..

नाना पटोले यांनी सरकारवर जोरदार टीका केली. शेतीच्या पंचनामाला उशीर का होत आहे म्हणत त्यांनी टीका केली. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शासनाकडे सर्व माहिती असताना अशा काळात सरकार पंचनामाचा बहाना करून वेळ काढू पणा करत आहे.

महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था राहिली नाही, नाना पटोले यांची सरकारवर थेट टीका..
Nana Patole
| Updated on: Sep 30, 2026 | 11:36 AM

नाना पटोले यांनी नुकताच सरकारवर जोरदार टीका केली. नाना पटोले यांनी म्हटले की, आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शासनाकडे सर्व माहिती असताना अशा काळात सरकार पंचनामाचा बहाना करून वेळ काढू पणा करत आहे. सरकारचा हा बेजबाबदारापणा शेतकऱ्यांच्या रागातून स्पष्ट होत आहे. कर्नाटक सरकारने मदत देण्यास सुरुवात केली आहे मग महाराष्ट्र सरकारला मदत देण्यास काय अडचण आहे.. सरकारने आजच्या आज शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करायला सुरुवात करायला पाहिजे. मदतीचा हात आणि आधार देऊन या संकटातून शेतकऱ्याला न्याय द्यावा ही आमची अपेक्षा. तात्काळ सरकारने मदतीचा हात शेतकऱ्यांना दिला नाही तर काँग्रेसला रस्त्यावरची लढाई लढावी लागेल. याची जबाबदारी सरकारची असेल.

पुढे त्यांनी म्हटले की, महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था राहिली नाही. राज्यात आता विरोधकांना देखील सुरक्षा नाही. सत्ता पक्षातील देखील अनेक लोकांना सुरक्षेची काळजी लागली आहे. महाराष्ट्रातील पोलीस फक्त चाटुगिरी करणारे आयएएस अधिकारी चांगल्या पोस्टवर आपल्याला बघायला मिळतात. चांगले अधिकाऱ्यांना बगल दिल्याने महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढत आहे.

Loading...

गुन्हेगारीच महाराष्ट्र करण्यात सरकारला यश आलं मात्र महाराष्ट्राची प्रतिमा पणाला लागली याची काळजी माहिती सरकारने घ्यावी.. सरकारने वेळ काढू पणा करण्यापेक्षा 99 टक्के भागात 1972 पेक्षा भयंकर दुष्काळ आहे. 1972 मध्ये पिण्याचा पाणी तरी लोकांना मिळाला. मात्र या दुष्काळात पाणी देखील मिळणे कठीण आहे. सरकार गंमत जंमत करत दुष्काळ जाहीर करत नसेल तर हे सरकार गेंड्याच्या कातडीचा झाला आहे का..? अशी आज महाराष्ट्रातील परिस्थिती आहे.

सरकारने सरसकट दुष्काळ जाहीर करून त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात मदत द्यावी ही आमची भूमिका.. दुष्काळ जाहीर करताना मंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात दुष्काळ जाहीर केला आहे. नागपूर जिल्ह्याचे उदाहरण पाहिलं तर त्याचा नमुना आपल्याला पाहायला मिळेल. मंत्री किंवा आमदाराच्या भागात दुष्काळ जाहीर करणं असा भेदभाव हे सरकार कसं करू शकते.

सचिन वाझेच्या जामीनावर बोलताना त्यांनी म्हटले की, ते होणारच होतं. त्यावेळीच हे कट रचलेलं आम्हाला माहीत होता. अंबानीच्या घराचा सहारा घेऊन एक फेक नेरेटिव्ह महाराष्ट्रात उभा केला गेला. आलेली जिलेडिंग नागपूरमधून आली होती असा आम्ही विधानसभेत प्रश्न विचारला होता. ती माहिती आम्हाला सरकारने दिली. मग नागपूरहून ही जिलेडिंग कोणी दिली. जिलेडिंग लावणारा माणूस पाण्यात बुडून आत्महत्या केली असे चित्र उभं केलं.

त्यावेळच्या महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी केलेलं हे फेक निगेटिव्ह होतं. वाझे आता सरकारी साक्ष होतील आणि परमवीर सिंग यांचे तर सध्या पत्ताच नाही.. नरेंद्र मोदी अमित शहा यांनी मिळून निवडणूक आयोगाला सोबत घेऊन लोकांच्या मतावरच डाका टाकण्याचे काम चालू केला आहे. ज्या ठिकाणी सतराशे मतं आहेत तिथे एकच व्यक्तीचं नाव असल्याचं राहुल गांधी यांनी उघड केलं. महाराष्ट्रातील निवडणूक आयुक्तांनी देखील पत्र लिहून केंद्रीकरण करू नये असं सांगितल आहे.

ज्ञानेश कुमार आणि राजीव कुमार या दोघांनी देशातील लोकशाहीचा गळा घोटण्याचा काम केला आहे. आमच्यासह शरद पवारांनी तीन दिवसाचे अधिवेशन घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांना मागणी केली आहे. कर्नाटकच्या सरकारने विरोधकांना सोबत घेऊन बैठक घेतली आणि दुष्काळ जाहीर केला. सोबतच सर्व पक्ष मिळून केंद्राकडून मदत मिळावी यासाठी सर्वपक्षीय प्रस्ताव कर्नाटक विधानसभेत मंजूर झालाय.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us