AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; संजय राऊतांनी सांगितलं खरं कारण, म्हणाले...

Sanjay Raut : प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; संजय राऊतांनी सांगितलं खरं कारण, म्हणाले…

| Updated on: Sep 30, 2026 | 10:57 AM
Share

संजय राऊत यांनी प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात शिंदे गटावर गंभीर आरोप केले आहेत. गोळीबार करणाऱ्यांमागे खरे सूत्रधार शिंदे गटात असल्याचा दावा त्यांनी केला. देवेंद्र फडणवीस यांनी कठोर कारवाई न केल्यास राजीनामा द्यावा, अशी मागणी करत त्यांनी ठाण्यातील बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेवर चिंता व्यक्त केली.

ठाण्यात झालेल्या प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणानंतर राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी या प्रकरणी शिंदे गटावर गंभीर आरोप केले आहेत. गोळ्या झाडणाऱ्यांमागे खरे सूत्रधार शिंदे गटातच असून त्यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी राऊत यांनी केली आहे.

राऊत यांनी राज्याच्या गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला. ठाण्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याचा आरोप करत, गृहमंत्री ठाण्यातील स्थिती हाताळू शकत नसतील तर त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी राऊत यांनी केली. ठाणे हे एकेकाळी शांत शहर म्हणून ओळखले जात होते, मात्र आता ते गुंड, अमली पदार्थ विक्रेते आणि बिल्डर लॉबीचे केंद्र बनले आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

राऊत यांच्या माहितीनुसार, पक्षाचे नेते उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि राजन विचारे या प्रकरणात लक्ष घालून आहेत. पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांसोबत पक्ष खंबीरपणे उभा असल्याचेही त्यांनी नमूद केले. या प्रकरणात तातडीने आणि कठोर कारवाई करण्याची मागणी राऊत यांनी केली आहे.

 

Published on: Sep 30, 2026 10:57 AM

Follow Us