AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pradeep Purnekar Death Case: गणेशोत्सवात रेकी केली, संधी मिळताच हल्लेखोरांनी साधला डाव, प्रदीप पूर्णेकरांच्या मृत्यूपूर्वी रात्री नक्की काय घडलं?

Uddhav Thackeray Shivsena Pradeep Purnekar Death Case: ठाण्यातील मानपाडा येथील ठाकरे सेनेचे विभागप्रमुख प्रदीप पुर्णेकर यांच्या निर्घृण हत्येने एकच खळबळ उडाली आहे. तापस जसा पुढे सरकत आहे, तशी धक्कादायक माहिती समोर येत आहे.

Pradeep Purnekar Death Case: गणेशोत्सवात रेकी केली, संधी मिळताच हल्लेखोरांनी साधला डाव, प्रदीप पूर्णेकरांच्या मृत्यूपूर्वी रात्री नक्की काय घडलं?
उद्धव ठाकरे शिवसेना विभागप्रमुख प्रदीप पुर्णेकर
| Updated on: Sep 30, 2026 | 11:35 AM
Share

ठाण्यातील मानपाडा परिसरातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पुर्णेकर यांची काल रात्री निर्घृण हत्या करण्यात आली. मनोरमा नगर परिसरातील कार्यालयात असताना रात्री साडेनऊच्या सुमारासा अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. हल्लेखोरांनी त्यांच्यावर शस्त्रानेही वार केल्याची माहिती समोर येत आहे. पुर्णेकर यांच्या कार्यालयाजवळील सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. त्यात काही आरोप तोंडाला रूमाल बांधून स्कुटीवर आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात अजून एक व्हिडिओ समोर आला आहे. दरम्यान या हल्ल्याच्या काही दिवसांपूर्वी हल्लेखोरांनी परिसराची रेकी केल्याचे समोर आले आहे.

गणपतीत रेकी, मग डाव साधला

याप्रकरणी आता दोन सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. प्रदीप पुर्णेकर यांचे बंधू जयनाथ पुर्णेकर यांनी याप्रकरणी माजी महापौर मिनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्यावर या हत्येचामागे हात असल्याचा आरोप केला आहे. निळकंठ इमारतीत याविषयीची बैठक घेण्यात आली. त्यानंतर गणपतीच्या काळात हल्लेखोरांनी या परिसराची आणि कार्यालयाची रेकी केली. ते काही दिवस पाळत ठेऊन होते. त्यानंतर त्यांनी काल रात्री हल्ला केल्याचा आरोप जयराम पुर्णेकर यांनी केला. मानपाडा क्लस्टर डेव्हलपमेंट आणि राजकीय वर्चस्वातून ही हत्या झाल्याचा आरोप पुर्णेकर कुटुंबियांनी केला.

सात राऊंड फायर, छातीत लागल्या गोळ्या

जयनाथ पुर्णेकर यांनी सांगितले की, ते सर्व नवरात्रौत्सवासाठी परिसरात वर्गणी करत होते. त्यावेळी प्रदीप पुर्णेकर हे त्यांच्या कार्यालयात बसलेले होते. रात्री 9 वाजून 32 मिनिटांनी त्यांच्या कार्यालयात काहीजण आले. त्यांनी पिस्तूलातून सात राऊंड फायर केले. हे हल्लेखोर स्कुटीवर आल्याचे सीसीटीव्हीत दिसत आहे. आपला भाऊ समाजहितासाठी काम करत होता. या भागात ड्रग्ज विक्री होती होती. त्याला त्याचा विरोध होता. मी त्याला अनेकदा सांगायचो की, पोलिसांना सोबत घेऊन जात जा. त्याला धमकीचेही फोन यायचे. माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांच्याशी झालेल्या वादातून ही हत्या झाल्याचा आरोप जयराम पुर्णेकर यांनी केला.

सात गोळ्या झाडल्याचा आवाज

या घटनेच्यावेळी नवीन सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. एका औषधी दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात या परिसरातील घटना कैद झाली आहे. या नवीन फुटेजमध्ये आरोपींनी प्रदीप पुर्णेकर यांच्यावर सात गोळ्या झाडल्याचा आवाज स्पष्टपणे ऐकू येत आहे. गोळीबारानंतर गंभीर जखमी पुर्णेकर यांना नागरिक आणि कार्यकर्त्यांनी लागलीच रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. कापूरबावडी पोलिसांनी प्रकरणात सीसीटीव्ही आधारे दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. तर इतर आरोपींचा शोध सुरू आहे. या घटनेत एकूण पाच संशयित आरोपी असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

Follow Us
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; म्हणाले...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; मुख्यमंत्र्यांना केलं भावनिक आवाहन, म्हणाले...
प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; राऊतांनी सांगितलं खरं कारण म्हणाले..
Sanjay Raut : प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; संजय राऊतांनी सांगितलं खरं कारण, म्हणाले...
रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
Ratnagiri : रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; गजानन महाराज...
Dry Drought Help : राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; शेगावच्या गजानन महाराज संस्थानकडून तब्बल एवढी मदत जाहीर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर....
Thane : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर, जुन्या वादातून....
संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
मोठी बातमी! संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य
Sachin Waze : साडेपाच वर्षांनी सचिन वाझेला जामीन! अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
Thane | ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...