AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nanded | नांदेडच्या कहाळा परिसरात जळालेली दुचाकी , संजय बियाणींच्या हत्येसाठी हिचाच वापर केला का?

तीन महिन्यांपूर्वी सुरक्षा काढून घेण्यात आली आणि त्यानंतर त्यांची अशा प्रकारे हत्या करण्यात आली. त्यामुळे या हत्येमागे खंडणीखोर असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र अद्याप कोणताही महत्त्वाचा क्लू पोलिसांच्या हाती आलेला नाही.

Nanded |  नांदेडच्या कहाळा परिसरात जळालेली दुचाकी , संजय बियाणींच्या हत्येसाठी हिचाच वापर केला का?
Reporter Rajiv Giri
Reporter Rajiv Giri | Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Apr 16, 2022 | 1:04 PM
Share

नांदेड : प्रसिद्ध बिल्डर संजय बियाणी (Sanjay Biyani) यांच्या हत्येसाठी जी दुचाकी वापरण्यात आली होती, त्यासारखीच दिसणारी एक दुचाकी नांदेडमध्ये जळीत (Burned Bike) अवस्थेत आढळली आहे. त्यामुळे बियाणींच्या हत्येसाठी वापरलेली बाइक जाळून पुरावा नष्ट केला की काय असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. 8 एप्रिल रोजी नांदेडमधील प्रसिद्ध बिल्डर संजय बियाणी यांची त्यांच्या राहत्या घरासमोरच गोळ्या झाडून हत्या (Murder case) करण्यात आली होती. दुचाकीवरून आलेल्या दोन मारेकऱ्यांनी  त्यांच्या जवळ जाऊन चार गोळ्या झाडल्या होत्या. या घटनेला आठ ते नऊ दिवस उलटले असूनही पोलिसांना अद्याप महत्त्वाचा क्लू सापडलेला नाही.

Sanjay Biyani Nanded

हीच ती दुचाकी का ?

संजय बियाणी यांच्या हत्येला आठ दिवस उलटल्यानंतर कहाळा परिसरात ही जळालेली दुचाकी सापडली आहे. विशेष म्हणजे नायगाव तालुक्यातील कुंटुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रस्त्यापासून दूर अंतरावर ही जाळलेली दुचाकी आढळून आलीय. त्यामुळे या प्रकरणात संशय बळावला असून पोलीस या घटनेचा तपास करतायत.

बियाणींच्या हत्येचे गूढ कायम

नांदेडमधील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची 8 एप्रिल रोजी त्यांच्या राहत्या घरासमोर हत्या करण्यात आली होती. गरीबांना कमी किंमतीत फ्लॅट उपलब्ध करून देणारे अशी त्यांची ख्याती आहे. काही वर्षांपूर्वी खंडणीखोरांचे त्यांना धमक्यांसाठी फोनही येत होते. त्यामुळे त्यांना सुरक्षा देण्यात आली होती. मात्र तीन महिन्यांपूर्वी सुरक्षा काढून घेण्यात आली आणि त्यानंतर त्यांची अशा प्रकारे हत्या करण्यात आली. त्यामुळे या हत्येमागे खंडणीखोर असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र अद्याप कोणताही महत्त्वाचा क्लू पोलिसांच्या हाती आलेला नाही.

इतर बातम्या-

धनंजय मुंडे यांना रुग्णालयातून डिश्चार्ज, प्रकृती चांगली असल्याची डॉक्टरांची माहिती

Crime : उपचारासाठी आलेल्या मुलीला झोपेचं औषध देऊ करत होता बलात्कार, 23 वर्ष जुन्या प्रकरणात कारवाई

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार