AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nanded : ‘मुजरा राजं… किंग ऑफ मिलियन हार्ट’, उदयनराजेंना नांदेडच्या तरुणाने पाठवलं रक्तानं लिहिलेलं पत्र, व्यक्त केली अनोखी इच्छा!

किंग ऑफ मिलियन हार्ट... उदयन राजे असं म्हणत नांदेड शहरातील एका तरुणाने खासदार उदयनराजे यांना रक्ताने पत्र लिहिलंय.

Nanded : 'मुजरा राजं... किंग ऑफ मिलियन हार्ट', उदयनराजेंना नांदेडच्या तरुणाने पाठवलं रक्तानं लिहिलेलं पत्र, व्यक्त केली अनोखी इच्छा!
| Edited By: | Updated on: Dec 04, 2021 | 10:10 PM
Share

नांदेड : तरुणाईमध्ये उदयनराजे यांची किती क्रेझ आहे हे आपण अनेकदा बघितलं आहे. उदयनराजेंचा स्वभावही तसाच बिंदास आहे. त्यामुळेच तरुणाई त्यांच्याकडे आकर्षित होते. त्यामुळेच  किंग ऑफ मिलियन हार्ट… उदयन राजे असं म्हणत नांदेड शहरातील एका तरुणाने खासदार उदयनराजे यांना रक्ताने पत्र लिहिलंय. राजे तुम्हला घट्ट मिठी मारायची आहे, तुम्ही मारलेल्या मिठीतून शंभर वाघांची ताकद आम्हला मिळते, असं प्रेरणादायी पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नांदेड शहरातील विजय टर्के असं या तरुणाचं नाव आहे. विशेष म्हणजे विजय ने हे पत्र खासदार उदयनराजे यांना प्रत्यक्ष भेटून त्यांना दिलं. सध्या या पत्राची जोरदार चर्चा सुरू आहे.

नेमकं काय लिहिलंय या पत्रात?

राजेंना लिहलेल्या या पत्रातला मजकूर पुढीलप्रमाणे आहे.

आमचे श्रद्धास्थान फक्त छत्रपती

मुजरा राजं

महाराज साहेब आपण आमच्या समोर असताना काय बोलावे काहीच सुचत नाही. पण तुमच्याकडे सारखे बघतच राहावं असं मनाला वाटते, महाराज साहेब एकवेळेस आपल्याला घट्ट मिठी मारायची आहे, तुम्ही मारलेल्या त्या मिठीतुन 100 वाघांची ताकद अंगी येते. महाराज साहेब अखंड हिंदुस्थान तुमच्यावर जीव ओवाळून टाकतो, महाराज आम्ही तुमच्यावर खूप प्रेम करतो आणि शेवटीपर्यंत कधीही आपली साथ सोडणार नाही, हा शब्द आहे आमचा म्हणून स्वतःच्या रक्तानी पत्र लिहिले आहे, महाराज साहेब.

जय जिजाऊ, जय शिवराय, जय उदयनराजे

*रयतेचे राजे उदयनराजे *मावळ्यांचे प्रेम उदयनराजे *शत्रूची धडकी उदयनराजे *दीन दुबळ्यांचे कैवारी उदयनराजे *गोर गरिबांचे पाठीराखे उदयनराजे *सातारा राजधानीचे परमनंट खासदार उदयनराजे

अवघा महाराष्ट्र गरजे उदयनराजे…उदयनराजे…उदयनराजे King of millions hert’s महाराज साहेब..

आपलाच मावळा विजय पाटील, टर्के,नांदेड

अशा अशयाचं पत्र या तरुणाने उदयनराजे भोसले यांना लिहलं आहे. उदयनराजेंच्या थाटाची सर्वत्र चर्चा होत असते. उदयनराजेंच्या कॉलर उडवण्याच्या स्टाईलचेही कित्येक फॅन आहेत. त्यामुळेच अशी पत्र उदयनराजेंना येतात.

गावठी कट्टा आणायला लावला, नंतर गोळ्या झाडून हत्या, अनैतिक संबंध उघड झाल्याने केली पतीची हत्या

एलआयसी आयपीओमध्ये सहभागी होण्यासाठी पॉलिसीधारकांना डीमॅट अकाऊंट अनिवार्य, जाणून कसे उघडायचे खाते?

नायर रुग्णालय प्रकरणी आशिष शेलारांकडून दिशाभूल सुरु, महापौर किशोरी पेडणेकरांचा पलटवार

KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.