AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एलआयसी आयपीओमध्ये सहभागी होण्यासाठी पॉलिसीधारकांना डीमॅट अकाऊंट अनिवार्य, जाणून कसे उघडायचे खाते?

बँक खात्याप्रमाणे डीमॅट खाते असते. बँक खात्यात पैशाचा व्यवहार होतो तर डीमॅट खात्यात शेअर्सचा व्यवहार डीमॅट खात्यात होतो. देशातील कोणत्याही व्यक्तीने शेअर बाजारात थेट गुंतवणूक करण्यासाठी डीमॅट खाते उघडणे आवश्यक आहे. डिमॅट खात्याशिवाय स्टॉक एक्सचेंजमध्ये कोणत्याही कंपनीचे शेअर्स खरेदी-विक्री करता येत नाही.

एलआयसी आयपीओमध्ये सहभागी होण्यासाठी पॉलिसीधारकांना डीमॅट अकाऊंट अनिवार्य, जाणून कसे उघडायचे खाते?
एलआयसी आयपीओमध्ये सहभागी होण्यासाठी पॉलिसीधारकांना डीमॅट अकाऊंट अनिवार्य
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Dec 04, 2021 | 9:16 PM
Share

नवी दिल्ली : लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (LIC) चा आयपीओ येणार आहे. विमा कंपनीने त्यांच्या पॉलिसीधारकांना त्यांचे पॅन अपडेट करण्यास सांगितले आहे. जेणेकरून कंपनी प्रस्तावित सार्वजनिक प्रस्तावात बोली लावू शकेल. तसेच, आयपीओमध्ये सहभागी होण्यासाठी पॉलिसीधारकाकडे डिमॅट खाते नसल्यास त्यांनी ते उघडावे. एलआयसीच्या प्रस्तावित इश्यू योजनेनुसार, आयपीओ इश्यू आकाराच्या 10 टक्क्यांपर्यंत पॉलिसीधारकांसाठी राखीव असेल. भारतातील कोणत्याही IPO मध्ये सहभागी होण्यासाठी वैध डीमॅट खाते असणे आवश्यक आहे.

डीमॅट खाते काय आहे?

बँक खात्याप्रमाणे डीमॅट खाते असते. बँक खात्यात पैशाचा व्यवहार होतो तर डीमॅट खात्यात शेअर्सचा व्यवहार डीमॅट खात्यात होतो. देशातील कोणत्याही व्यक्तीने शेअर बाजारात थेट गुंतवणूक करण्यासाठी डीमॅट खाते उघडणे आवश्यक आहे. डिमॅट खात्याशिवाय स्टॉक एक्सचेंजमध्ये कोणत्याही कंपनीचे शेअर्स खरेदी-विक्री करता येत नाही. शेअर्स व्यतिरिक्त, म्युच्युअल फंड युनिट्स, डिबेंचर, बाँड आणि सरकारी सिक्युरिटीज देखील डिमॅट खात्यात ठेवता येतात. डीमॅट खाते ब्रोकर किंवा वित्तीय संस्थेमार्फत उघडता येते.

डिमॅट खाते कसे उघडायचे?

डीमॅट खाते उघडण्यासाठी, प्रथम तुम्हाला डिपॉझिटरी पार्टिसिपंट (डीपी) निवडावा लागेल. ती कोणतीही अधिकृत बँक, वित्तीय संस्था किंवा दलाल असू शकते. ज्यांच्यासोबत डिमॅट खाते उघडता येते. डीपीची निवड सामान्यतः ब्रोकरेज चार्जेस, वार्षिक शुल्क आणि लीव्हरेजच्या आधारे केली पाहिजे. डीपी निवडल्यानंतर खाते उघडण्याचा फॉर्म आणि केवायसी फॉर्म सबमिट करावा लागेल. यासोबत तुम्हाला काही कागदपत्रे द्यावी लागतील.

– पॅन कार्ड – राहण्याचा पुरावा – ओळखपत्र – पासपोर्ट आकाराचा फोटो

पडताळणी प्रक्रियेसाठी मूळ प्रत तुमच्याकडे ठेवा. याशिवाय, तुम्हाला बँक तपशीलासाठी कँसल चेक देखील द्यावा लागेल. यानंतर, तुम्हाला एका करारावर स्वाक्षरी करावी लागेल, ज्यामध्ये डीमॅट होल्डिंगशी संबंधित सर्व नियम, अधिकार आणि नियमांची माहिती असेल. नियम आणि अटी काळजीपूर्वक वाचा.

तुम्ही डिमॅट खाते उघडल्यानंतर, तुम्हाला डीपीकडून एक युनिक क्लायंट आयडी मिळेल. त्यात इतर तपशील असतील, ज्याद्वारे तुम्ही डिमॅट खात्यात ऑनलाइन प्रवेश करू शकाल. याशिवाय, तुम्हाला DP कडून एक सूचना स्लिप देखील मिळेल, जी हस्तांतरण, खरेदी यासारख्या डिपॉझिटरी सेवांसाठी वापरली जाऊ शकते. डिमॅट खात्यात शेअर्स किंवा वित्तीय सिक्युरिटीजसाठी ‘किमान शिल्लक’ आवश्यक नाही. तुम्ही एकाच पॅनवर एकापेक्षा जास्त डिमॅट खाते लिंक करू शकता, तथापि, डीपी वेगळा असावा.

ऑनलाइन डिमॅट खाते कसे उघडायचे?

– सर्व प्रथम DP वेबसाइटवर जा. – ‘ओपन डीमॅट खाते’ टॅबवर क्लिक करा. – आवश्यक तपशील भरा आणि OTP द्वारे पुष्टी करा – यानंतर, डीपी डिमॅट खाते उघडण्यासाठी पुढील औपचारिकता पूर्ण करेल. – तुमच्या वतीने अपलोड केलेल्या कागदपत्रांची पडताळणी करण्याचे काम डीपी एक्झिक्युटिव्ह करेल. – ब्रोकरेज फर्मच्या एक्झिक्युटिव्हकडून फोन कॉल किंवा प्रत्यक्ष भेटीद्वारे देखील केले जाऊ शकते. – आजच्या काळात, ब्रोकरेज फर्म देखील टेलि-व्हेरिफिकेशनची सुविधा देत आहेत.

तपशिलांची पडताळणी झाल्यानंतर, तुमचे खाते अधिकृतपणे शेअर ट्रेडिंगसाठी मंजूर केले जाईल. तुम्हाला डीपी आयडी, लाभार्थी आयडी किंवा डीमॅट खाते क्रमांक आणि पॉवर ऑफ अॅटर्नी (पीओए) क्रमांक यासारखे तपशील डीमॅट सेवा प्रदात्याकडून मिळतील. यानंतर, तुम्ही कोणत्याही IPO मध्ये गुंतवणूक करण्यास पूर्णपणे पात्र असाल. (Demat account mandatory for policyholders to participate in LIC IPO)

इतर बातम्या

एटीएम मशीनमध्ये पैसे अडकले? मग चिंता करु नका, या टिप्स फॉलो करा

PPF: गुंतवणूक करायचीय? मग पीपीएफ ठरेल उत्तम पर्याय, मिळतील ‘हे’ 5 मोठे फायदे

Follow Us
शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
Shivsena : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड; शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
Manoj Jarange Patil on Prasad Lad : एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
Manoj Jarange on Ramdas Kadam : मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
Navnath Ban On Jarange Viral Audio Clip : मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; जरांगे पाटलांचं फडणवीसांना आव्हान
Jarange Patil On Viral Audio Clip : ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; मनोज जरांगे पाटलांचं देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान
जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं?
Manoj Jarange Viral Audio Clip : जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं? महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
मनोज जरांगेंना डॅमेज करण्याचा डाव? कथित ऑडिओ क्लिपमधील संभाषणाने....
Jarange Patil Viral Audio Clip : मनोज जरांगेंना डॅमेज करण्याचा डाव? कथित ऑडिओ क्लिपमधील संभाषणाने राजकीय वर्तुळात खळबळ
जरांगेंनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये अतुल नावाचा उल्लेख; नेमकं प्रकरण..
Jarange Patil Viral Audio Clip : जरांगेंनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये अतुल नावाचा उल्लेख; नेमकं प्रकरण काय?
500 कोटींचे पुरावे माझ्याकडे; मनोज जरांगे पाटील यांचा मोठा दावा....
Manoj Jarange On Eknath Shinde : 500 कोटींचे पुरावे माझ्याकडे; मनोज जरांगे पाटील यांचा मोठा दावा, पुढे काय म्हणाले?
मनोज जरांगेंना 500 कोटी मिळाल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल....
Jarange Patil Viral Audio Clip : मनोज जरांगेंना 500 कोटी मिळाल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल; श्रीकांत शिंदेंचंही नाव, जरांगे काय खुलासा करणार?