AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एटीएम मशीनमध्ये पैसे अडकले? मग चिंता करु नका, या टिप्स फॉलो करा

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने या परिस्थितीबद्दल काही मार्गदर्शक तत्त्वे देखील जारी केली आहेत, ज्याचे अनुसरण करून, तुम्हाला तुमचे पैसे मिळतील. या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, बँकांना एका आठवड्यात पैसे परत करावे लागतील, ते अयशस्वी झाल्यास तुम्ही बँकिंग लोकपालशी संपर्क साधू शकता.

एटीएम मशीनमध्ये पैसे अडकले? मग चिंता करु नका, या टिप्स फॉलो करा
एटीएम मशीनमध्ये पैसे अडकले? मग चिंता करु नका, या टिप्स फॉलो करा
| Edited By: | Updated on: Dec 04, 2021 | 6:55 PM
Share

नवी दिल्ली : आपण आपल्या दैनंदिन व्यवहारात नेहमीच एटीएमचा वापर करतो. केव्हाही पैशांची गरज लागल्यास एटीएम अत्यंत फायदेशीर ठरते. एटीएममुळे बँकेत तासन्तास रांग लावण्याचा त्रास वाचतो. त्यामुळे प्रत्येक जण पैसे काढण्यासाठी एटीएमचाच वापर करतो. मात्र अनेकदा असे होते आपण एटीएममध्ये पैसे काढण्याची सर्व प्रक्रिया करतो, पैसे कट झाल्याचा मॅसेज येतो. मात्र तांत्रिक अडचणीमुळे पैसे मशिनमधून बाहेर येत नाहीत, मशिनमध्येच अडकतात. अनेक वेळा सर्व्हर डाउनमुळे तुमचे पैसे ऑनलाइन अडकतात, अशा स्थितीत टेन्शन असते. मात्र त्यादरम्यान बँकेला याबाबत लवकरात लवकर माहिती देण्याचा प्रयत्न केला जातो. एटीएम मशीनमधून पैसे काढण्याची प्रक्रिया पूर्ण करून पैसे अडकले तर चिंता करण्याची गरज नाही.

एटीएम मशीनमध्ये पैसे अडकले तर काय करावे?

1. एटीएममधून पैसे काढण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही पैसे निघाले नसतील आणि तुमच्या खात्यातून पैसेही कापले गेले असतील, तर अशा स्थितीत अस्वस्थ होण्याऐवजी ट्रान्झॅक्शन स्लिप तुमच्याकडे ठेवा. कारण ही स्लिप एक प्रकारचा पुरावा आहे, ज्यामुळे तुम्ही एटीएममधून किती पैसे काढले हे सिद्ध होईल, परंतु जर तुम्हाला ट्रान्झॅक्शन स्लिप मिळाली नसेल, तर तुम्ही ती बँक स्टेटमेंटमधूनही घेऊ शकता.

2. या परिस्थितीत, ग्राहकाला शाखेकडे लेखी तक्रार द्यावी लागते, अशा परिस्थितीत व्यवहाराच्या स्लिपची छायाप्रत जोडावी लागते. कारण या व्यवहाराच्या स्लिपमध्ये वेळ, ठिकाण, एटीएम आयडी आणि बँकेचा प्रतिसाद कोडही छापलेला असतो, त्यामुळे ही स्लिप आवश्यक आहे.

3. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने या परिस्थितीबद्दल काही मार्गदर्शक तत्त्वे देखील जारी केली आहेत, ज्याचे अनुसरण करून, तुम्हाला तुमचे पैसे मिळतील. या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, बँकांना एका आठवड्यात पैसे परत करावे लागतील, ते अयशस्वी झाल्यास तुम्ही बँकिंग लोकपालशी संपर्क साधू शकता. आठवडाभरानंतरही ग्राहकाने पैसे परत न केल्यास बँकेला दररोज 100 रुपये द्यावे लागतील.

4. एटीएम मशिनमध्ये पैसे अडकले तर तुम्ही कस्टमर केअरला ताबडतोब कॉल करू शकता, पण तिथून योग्य प्रतिसाद न मिळाल्यास तुम्ही तुमच्या बँकेच्या शाखेत जाऊन तक्रार नोंदवावी. (If you get stuck in an ATM machine, follow these tips)

इतर बातम्या

PPF: गुंतवणूक करायचीय? मग पीपीएफ ठरेल उत्तम पर्याय, मिळतील ‘हे’ 5 मोठे फायदे

EPFO : आता एका तासात तुमच्या बँक खात्यात पीएफचे पैसे येणार, असा करा ऑनलाइन अर्ज

29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.