PPF: गुंतवणूक करायचीय? मग पीपीएफ ठरेल उत्तम पर्याय, मिळतील ‘हे’ 5 मोठे फायदे

सरकारी बचत योजना असल्याने, ग्राहकांना सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीमध्ये गुंतवणुकीवर सुरक्षा मिळते. साधारणपणे, ज्या लोकांना कोणताही धोका पत्करायचा नसतो आणि निश्चित व्याजदराचा लाभ घ्यायचा असतो, ते या योजनेत गुंतवणूक करतात.

PPF: गुंतवणूक करायचीय? मग पीपीएफ ठरेल उत्तम पर्याय, मिळतील 'हे' 5 मोठे फायदे
गुंतवणूक करायचीय? मग पीपीएफमध्ये करा गुंतवणूक

Benefits of investing in PPF: सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) ही सर्वात लोकप्रिय दीर्घकालीन बचत योजनांपैकी एक आहे. त्यात अल्प बचत गुंतवून परतावा मिळू शकतो. या योजनेचा उपयोग निवृत्तीच्या वेळी आर्थिक गरजा भागवण्यासाठीही करता येतो. त्याचा कालावधी 15 वर्षे आहे. तथापि, ग्राहकाने अर्ज केल्यास ते पाच वर्षांसाठी वाढविले देखील जाऊ शकते. काही प्रकरणांमध्ये, आंशिक पैसे काढण्याची देखील परवानगी आहे. पीपीएफमध्ये व्याज दर, सुरक्षा आणि कराच्या बाबतीतही फायदे उपलब्ध आहेत. यामध्ये, खाते उघडल्यानंतर काही वर्षांनी कर्ज आणि आंशिक पैसे काढण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे.

चांगले व्याज दर

केंद्र सरकार प्रत्येक तिमाहीत पीपीएफ खात्यांचे व्याजदर बदलते. सध्या, PPF खात्यावरील व्याज दर 7.1 टक्के आहे, जो वार्षिक आधारावर चक्रवाढ आहे. अनेक बँकांमध्ये, ग्राहकांना सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीवर मुदत ठेव (FD) च्या तुलनेत जास्त व्याज मिळते.

कालावधी वाढवण्याचा पर्याय

योजनेंतर्गत ग्राहकांना 15 वर्षांचा कालावधी मिळतो. यानंतर, ते कर सवलतीच्या कक्षेत येणारी रक्कम काढू शकतात. तथापि, सदस्य गुंतवणुकीच्या पुढील विस्तारासाठी आणखी 5 वर्षांसाठी अर्ज करू शकतात. आणि त्यांना गुंतवणूक चालू ठेवायची आहे की नाही हे ते निवडू शकतात.

कर लाभ

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी आयकर कायदा, 1961 च्या कलम 80C अंतर्गत कर सवलती देते. योजनेत गुंतवलेल्या रकमेवर 1.5 लाख रुपयांपर्यंतची करसवलत मिळू शकते. PPF कर आकारणीच्या EEE (exempt-exempt-exempt) मॉडेलचे अनुसरण करते, याचा अर्थ त्यावर मिळणारे व्याज आणि परिपक्वता रक्कम दोन्ही करमुक्त आहेत.

गुंतवणूक सुरक्षा

सरकारी बचत योजना असल्याने, ग्राहकांना सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीमध्ये गुंतवणुकीवर सुरक्षा मिळते. साधारणपणे, ज्या लोकांना कोणताही धोका पत्करायचा नसतो आणि निश्चित व्याजदराचा लाभ घ्यायचा असतो, ते या योजनेत गुंतवणूक करतात. यामध्ये मिळणाऱ्या व्याजावर सार्वभौम हमी असते, ज्यामुळे ते बँकेच्या व्याजापेक्षा अधिक सुरक्षित होते. त्या तुलनेत, ठेव विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) द्वारे केवळ 5 लाख रुपयांपर्यंतच्या बँक मुदत ठेवींचा विमा उतरवला जातो.

कर्ज सुविधा

ग्राहक त्यांच्या पीपीएफ खात्यावर कर्जाचा लाभ घेऊ शकतात. खाते उघडण्याच्या तिसऱ्या ते सहाव्या वर्षापर्यंत कर्ज घेता येते. ज्या गुंतवणूकदारांना कोणतेही तारण न ठेवता अल्प मुदतीच्या कर्जासाठी अर्ज करायचा आहे त्यांच्यासाठी हे विशेषतः फायदेशीर आहे. कर्जासाठी अर्ज केलेल्या वर्षानंतरच्या दुसऱ्या आर्थिक वर्षाच्या शेवटी कमाल कर्जाची रक्कम शिल्लक रकमेच्या 25 टक्क्यांपर्यंत असू शकते. (Invest in PPF account, you will get 5 big benefits)

इतर बातम्या

EPFO : आता एका तासात तुमच्या बँक खात्यात पीएफचे पैसे येणार, असा करा ऑनलाइन अर्ज

ITR Filling | आयटीआर दाखल करण्याची अंतिम तारीख नजीक, मुदतीपूर्वी कर विभागाची ही सूचना अवश्य वाचा

Published On - 6:08 pm, Sat, 4 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI