नंदकिशोर कागलीवाल यांना विज्ञानातील मानद डॉक्टरेट प्रदान

Nandkishore Kagliwal : उद्योगपती व कृषी क्षेत्रातील तत्त्वचिंतक नंदकिशोर कागलीवाल यांना भारतीय कृषी क्षेत्रातील त्यांच्या मोलाच्या योगदानाबद्दल राजस्थान राज्य कृषी विद्यापीठ यांच्याकडून विज्ञानातील मानद डॉक्टरेट (Honoris Causa) प्रदान करण्यात आली आहे.

नंदकिशोर कागलीवाल यांना विज्ञानातील मानद डॉक्टरेट प्रदान
Nandkishore Kagliwal
Image Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Mar 10, 2026 | 5:49 PM

छत्रपती संभाजीनगर (दि.10) प्रख्यात उद्योगपती व कृषी क्षेत्रातील तत्त्वचिंतक नंदकिशोर कागलीवाल यांना भारतीय कृषी क्षेत्रातील त्यांच्या मोलाच्या योगदानाबद्दल राजस्थान राज्य कृषी विद्यापीठ यांच्याकडून विज्ञानातील मानद डॉक्टरेट (Honoris Causa) प्रदान करण्यात आली आहे. मंगळवार दि 10 मार्च रोजी जयपूर येथे हा सोहळा संपन्न झाला.

भारतीय बियाणे उद्योगाच्या विकासामध्ये केलेले त्यांचे अग्रगण्य कार्य, तंत्रज्ञान-संलग्न उच्च उत्पादकता व कीड-प्रतिरोधक बियाण्यांचा प्रसार तसेच ग्रामीण विकास, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील त्यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न यांचा गौरव या सन्मानाद्वारे करण्यात आला आहे. त्यांच्या कार्यामुळे देशभरातील असंख्य शेतकरी व समाजघटकांच्या जीवनमानावर सकारात्मक परिणाम झाला आहे.

मागील वर्षी, कागलीवाल यांना सेज विद्यापीठ, भोपाळ यांच्याकडून मानद डॉक्टरेट (डी.लिट.) प्रदान करण्यात आली होती. समावेशक विकासावर ठाम विश्वास असलेले कागलीवाल भारताची सामाजिक व सांस्कृतिक परंपरा, कला व वारसा जतन व संवर्धन करण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहिले आहेत. आता त्यांना राजस्थान राज्य कृषी विद्यापीठाकडून डॉक्टरेट देण्यात आलेली आहे.

 

Follow Us