राज्यात कुणाला किती जागा? नारायण राणेंची भविष्यवाणी

सिंधुदुर्ग : लोकसभा निवडणूक प्रचाराचा ज्वर चढलेला असतानाच आता कुणाला किती जागा मिळणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. या पार्श्वभूमीवर अनेक सर्व्हे येत आहेत. अशातच नारायण राणेंनीही भविष्यवाणी केली आहे. लोकसभा निवडणूक निकालाबद्दल भविष्यवाणी करताना राणे म्हणाले, ‘महाराष्ट्रात युतीला 20 ते 22 जागा मिळतील. यात शिवसेनेला 9 ते 10, तर भाजपला 12 जागांवर विजय मिळेल. …

राज्यात कुणाला किती जागा? नारायण राणेंची भविष्यवाणी

सिंधुदुर्ग : लोकसभा निवडणूक प्रचाराचा ज्वर चढलेला असतानाच आता कुणाला किती जागा मिळणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. या पार्श्वभूमीवर अनेक सर्व्हे येत आहेत. अशातच नारायण राणेंनीही भविष्यवाणी केली आहे.

लोकसभा निवडणूक निकालाबद्दल भविष्यवाणी करताना राणे म्हणाले, ‘महाराष्ट्रात युतीला 20 ते 22 जागा मिळतील. यात शिवसेनेला 9 ते 10, तर भाजपला 12 जागांवर विजय मिळेल. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसला 9 आणि काँग्रेसला 9 च्या आसपास जागा मिळतील.’ मुलगा निलेश राणेंच्या निवडणूक निकालावर भाकित करताना नारायण राणेंनी निलेश राणेंचा 60 हजार मतांनी विजयी होईल, असा दावा केला आहे. आता त्यांची ही राजकीय भविष्यवाणी किती खरी ठरते ते 23 मे रोजी निकालानंतरच स्पष्ट होईल.

उद्धव ठाकरे विकासावर काहीच बोलले नाही, राणेंना कसे ठेचायचा याचा उपदेश करुन गेले

निलेश राणेंना भरघोस मतांनी निवडून द्या. आम्ही तुमच्या सर्व समस्या सोडवू, असे आश्वासन देत नारायण राणेंनी ‘हा माझा शब्द आहे’ असेही म्हटले. यावेळी राणेंनी सिंधुदुर्गात 1990 पासून जो विकास केला, तो विकास आम्ही प्रचारात जनतेसमोर ठेवल्याचेही सांगितले. राणे म्हणाले, ‘मी मंत्री आणि पालकमंत्री असताना या जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न केला. रत्नागिरी-सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यात जवळजवळ सर्व आमदार शिवसेनेचे असताना त्यांनी या 5 वर्षात काय विकास केला? येथे प्रचाराला आलेले उद्धव ठाकरे कोणत्याही विकासाच्या मुद्द्यावर बोलले नाहीत. ते फक्त राणेंना कसे मारायचे, कसे ठेचायचे याचा उपदेश करुन गेले.’

यावेळी राणेंनी शिवसेनेला कोणतेही आर्थिक धोरण नाही, नितीमत्ता नाही, असेही टीकास्त्र सोडले. तसेच फक्त जाती-जातीत भांडणे लावणे एवढेच शिवसेनेचे काम असल्याचाही आरोप त्यांनी केला. दीपक केसरकरांवर टीका करताना राणे म्हणाले, ‘या जिल्ह्याला मिळालेले पालकमंत्री निष्क्रिय आहेत. ते फक्त खोटे बोलतात.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *