Nashik BJP News: स्वीकृतवरुन भाजपमध्ये वादंग, शहराध्यक्षांचा राजीनामा, प्रदेशाध्यक्षांची कारवाई

नाशिक महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवकांची यादी शहराध्यक्ष सुनील केदार यांनी परस्पर जाहीर केल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली आहे. सुनील केदार यांनी स्वीकृत नगरसेवकांची यादी शहराध्यक्षांनी परस्पर जाहीर केल्याने पक्षात नाराजी होती.

Nashik BJP News: स्वीकृतवरुन भाजपमध्ये वादंग, शहराध्यक्षांचा राजीनामा, प्रदेशाध्यक्षांची कारवाई
Nashik BJP News
| Edited By: | Updated on: Nov 27, 2026 | 6:28 PM

Nashik BJP News:  नाशिक महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या यादीवरुन भारतीय जनता पक्षामध्ये मोठा वाद झाल्याचे पाहायला मिळाले. नाशिक महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकांच्या निवड प्रक्रियेतील भाजपमधील संभाव्य उमेदवारांची यादी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना न दिल्यामुळे शहराध्यक्ष सुनील केदार यांचा राजीनामा घेतल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती. दुसरीकडे, सुनील केदार यांनी याबाबत मौन बाळगल्याने सस्पेन्स कायम होता. अखेर याबाबत आता पालकमंत्री गिरीश महाजन यांनी याबाबत महत्त्वाचा खुलासा दिला आहे.

नाशिक शहराध्यक्ष सुनील केदार यांचा राजीनामा… 

Loading...

याबाबत सविस्तर माहिती अशी की, भारतीय जनता पक्षाचे नाशिक शहराध्यक्ष सुनील केदार यांचा राजीनामा घेतल्याची माहिती पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. एकीकडे भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांनी माझ्यावर कुठलीही कारवाई झाली नसल्याचं स्पष्ट केल्यानंतर दुसरीकडे मात्र पालकमंत्र्यांनी हा नवा खुलासा केला आहे.

नाशिक महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवकांची यादी शहराध्यक्ष सुनील केदार यांनी परस्पर जाहीर केल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली आहे. सुनील केदार यांनी स्वीकृत नगरसेवकांची यादी शहराध्यक्षांनी परस्पर जाहीर केल्याने पक्षात नाराजी होती. या नाराजीनंतर प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी नगराध्यक्ष सुनील केदार यांचा राजीनामा घेतला आहे.

नवे शहराध्यक्ष कोण? इच्छुकांची फिल्डिंग! 

दरम्यान, सुनील केदार यांचा राजीनामा घेतल्यानंतर भाजपाचा नवीन शहराध्यक्ष आता कोण असणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. सुनील केदार यांच्या राजीनाम्यानंतर शहराध्यक्षपदासाठी फिल्डिंग सुरु केली आहे. सुनील केदार यांच्या जागी शहराध्यक्ष म्हणून पाच नावांची सध्या चर्चा आहे. यामध्ये माजी शहराध्यक्ष प्रशांत जाधव, गिरीश पालवे, विक्रांत चांदवडकर, लक्ष्मण सावजी, निलेश बोरा यांच्या नावाचा समावेश आहे. आता सुनील केदार यांच्या जागी कोणाची वर्णी लागणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us