AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रात हादरा! भोंदू अशोक खरात प्रकरणात थेट राज्यातील बड्या अधिकाऱ्याचा व्हिडीओ पुढे, मोठी खळबळ, एका..

भोंदू अशोक खरात प्रकरणामुळे राज्यात खळबळ उडाली. गंभीर आरोप केली जात आहेत. राज्यातील बड्या नेत्यांसोबतच काही अधिकाऱ्यांचे नावे पुढे येत आहेत. त्यामध्येच अंजली दमानिया यांनी राज्याची झोप उडवणारा व्हिडीओ आणि फोटो शेअर केला.

महाराष्ट्रात हादरा! भोंदू अशोक खरात प्रकरणात थेट राज्यातील बड्या अधिकाऱ्याचा व्हिडीओ पुढे, मोठी खळबळ, एका..
Ashok Kharat
| Updated on: Apr 14, 2026 | 7:50 AM
Share

नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात धक्कादायक खुलासे होत आहेत. महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या बहिणीची काल या प्रकरणात काही तास चाैकशी झाली. रूपाली चाकणकर भोंदू अशोक खरात याचे पाय धुताना दिसल्या. यासोबतच काही फोटोही व्हायरल झाली. यानंतर रूपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदासोबतच एनसीपीच्या राज्य महिला आयोग पदाचा राजीनामाही द्यावा लागला. खरात याच्या प्रकरणात राज्यातील काही महत्वाच्या नेत्यांची नावे आल्याने खळबळ उडाली. अशोक खरात याने हजारोंच्या संख्येत महिलांवर लैगिंग अत्याचार केले. या प्रकरणातील काही व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली. मोठ्या प्रमाणात खरातवर गुन्हे दाखल झाली. मात्र, ज्या तुलनेत त्याने महिलांवर अत्याचार केले, त्या तुलनेत महिला पुढे येत नाहीत. एसआयटी या प्रकरणात तपास करत आहे. काही वर्षात खरातने गडगंज मालमत्ता जमा केली.

अंजली दमानिया अशोक खरात प्रकरणात आक्रमक भूमिका घेत आहेत. त्यांनी नुकताच ट्विट करत मोठी खळबळ उडवून दिली. अंजली दमानिया यांनी शेअर केलेल्या व्हिडीओनंतर आणि फोटोनंतर प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले आहे. यासोबतच नाशिकचे आयजी दत्ता कराळे चांगलेच अडचणीत येऊ शकतात.

अंजली दमानिया यांनी अशोक खरात आणि नाशिकचे आयजी दत्ता कराळे यांचा व्हिडीओ आणि फोटो शेअर केला. भोंदू बाबा अशोक खरातच्या कार्यक्रमात IG दत्ता कराळे का गेले असा सवाल अंजली दमानिया यांनी उपस्थित केला.  भोंदू बाबाच्या कार्यक्रमात आयजी दत्ता कराळे यांनी भाषण देखील केल्याचा दावा करण्यात आला. दत्ता कराळे आणि भोंदू बाबा अशोक खरात यांच्यात 18 कॉल असल्याचा अंजली दमानिया यांचा दावा आहे.

तब्बल 18 कॉल दोघांमध्ये झाल्याचे सांगितले जाते. नाशिकचे पोलीस आयजी दत्ता कराळे यांच्या चौकशीची अंजली दमानिया यांनी आता थेट मागणी केली आहे. पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी प्रकरणात लक्ष देण्याची मागणीही त्यांनी केली. भोंदू अशोक खरात आणि नाशिक पोलिस IG यांच्यात नेमके काय संबंध आहेत, याची आता राज्यभरात जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...