AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik TCS : माझ्या साडीचा पदर रझाच्या हातात होता, माझ्या मांडीवर हात ठेवला, टीसीएस मधल्या हादरवून सोडणाऱ्या गोष्टी आल्या बाहेर

Nashik TCS : "रझा मेनने मला प्लेयर असं टोपण नाव दिलेलं. जेव्हा मी कधी ऑफिसला यायची, तेव्हा तो मला प्लेयर बोलायचा. माझ्या कामात काही अडचणी आल्या. मी शाहरुखला विचारलं तर तो रझाला बोलवायचा. त्यावेळी रझा तिथे येऊन विचारायचा, काय झालं प्लेयर?. काम जमत नाहीय का?"

Nashik TCS : माझ्या साडीचा पदर रझाच्या हातात होता, माझ्या मांडीवर हात ठेवला, टीसीएस मधल्या हादरवून सोडणाऱ्या गोष्टी आल्या बाहेर
Nashik IT Company
| Updated on: Apr 21, 2026 | 9:13 AM
Share

आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या नाशिक युनिट मधील धक्कादायक प्रकार रोज उघड होत आहेत. आता एका महिला कर्मचाऱ्याने सर्वसामान्यांना हादरवून सोडणारा खुलासा केला आहे. तिचं नुकतचं लग्न झालं होतं. ती नाशिकच्या टीसीएस ब्रांचमध्ये सहाय्यक म्हणून रुजू झाली. तिथे तिला प्लेयर, झिरो फिगर असे टोमणे ऐकावे लागले. हिंदू देवतांबद्दल कमेंट केल्या जायच्या. सहकाऱ्यांच्या अश्लील कृतीचा सामना करावा लागला. ज्या महिलांनी पुरुष सहकाऱ्यांवर लैंगिक छळ आणि जबरदस्ती धर्मांतराचे आरोप केलेत, त्यात ही महिला सुद्धा आहे. नाशिक पोलिसांच्या विशेष तपास पथकाने या प्रकरणात आतापर्यंत आठ जणांना अटक केली आहे. नऊ एफआयआर नोंदवले आहेत.

पीडित महिलेने पोलिसांना सांगितलं की, ‘ती नाशिकला सासू-सासऱ्यांसोबत राहते. नवरा पुण्याला नोकरीला आहे’ “माझं लग्न झाल्यानंतर 20 जून 2025 पासून मी नाशिकच्या टीसीएस ब्रांचमध्ये सहाय्यक म्हणून कामाला लागली. 24 जून 2025 पासून माझी तीन महिन्यांची ट्रेनिंग सुरु झाली. शाहरुख कुरेशी आणि जयेश गुंजाल माझे ट्रेनिंग लीडर होते” असं तिने पोलिसांना सांगितलं. “ही ट्रेनिंग सुरु असताना रझा मेनन नावाचा लोन्स ब्रांचचा टीम लीडर सतत ट्रेनिंग रुममध्ये यायचा. खरंतर त्याचा आमच्या ट्रेनिंगशी काही संबंध नव्हता. पण तो ट्रेनिंग रुममध्ये येऊन मला माझ्या खासगी आयुष्याबद्दल विचारायचा” असा दावा पीडित महिलेने केला आहे.  एनडीटीव्हीशी बोलताना पीडित महिलेने हे सर्व खुलासे केले आहेत.

हनिमूनला तुम्ही काय केलं?

“तुझा नवरा तर इथे राहत नाही. मग तू सर्व कसं संभाळतेस?. तुला भिती वाटत नाही का?. तुला काही हवं असेल तर मला सांग. मी तुझ्या मदतीसाठी नेहमीच तयार आहे” हे सर्व तो बोलायचा असं पीडितेने पोलिसांना सांगितलं. लग्नाला माझ्या महिनाच झाला होता. पण रझा माझ्या वैवाहित आयुष्याबद्दल कमेंट करायचा असं तिने सांगितलं. “तुझं नुकतचं लग्न झालय. हनिमूनला तुम्ही कुठे गेला होता? तिथे काय केलं? असं रझा विचारायचा” हे तिने पोलिसांना सांगितलं.

तुला भरपूर बॉयफ्रेंड असतील

रझा जेव्हा हे सर्व बोलायचा तेव्हा टीम लीडर शाहरुख कुरेशी त्याला प्रोत्साहन द्यायचा. शाहरुख सुद्धा कधी कधी मला माझं वैवाहिक आयुष्य कसं आहे, या बद्दल विचारायचा. तुझं लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज? असं शाहरुखने तिला विचारलेलं. “जर, नवऱ्यासोबत पटत नसेल तर आम्हाला सांग. आम्ही तुला काही गोष्टी शिकवू. तुला भरपूर बॉयफ्रेंड असतील. ते बॉयफ्रेंड अजूनही तुझ्या मागे असतील. तुझ्या कुटुंबाला, नवऱ्याला या बद्दल समजलं तर काय होईल? तू काय करशील?” असं रझा बोलल्याचा दावा महिलेने केला आहे.

माझ्या साडीचा पदर रझाच्या हातात होता

“या वर्षी मार्च महिन्यात मी गुढी पाडव्याला साडी नेसून ऑफिसमध्ये आली. मी लॉबीमधून चालत होती. त्यावेळी कोणीतरी माझ्या साडीचा पदर ओढत असल्याचं मला जाणवलं. मी वळून बघितल, तर माझ्या साडीचा पदर रझाच्या हातात होता. मी लगेच पदर खेचून घेतला. तो खूप घाणेरड्या पद्धतीने माझ्याकडे बघत होता” असं पीडित महिलेने सांगितलं.

तो जाणीवपूर्वक माझ्या शरीराला स्पर्श करायचा

“ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर महिलेने तिची नियमित ड्युटी सुरु केली. त्यावेळी 27 लोकांची टीम होती. त्या काळात असीफ अन्सारी नावाचा दुसऱ्या टीममधला कर्मचारी तिच्या शेजारी येऊन बसायचा. दुसऱ्या रिकाम्या जागा असल्या तरी तो शेजारी येऊन बसायचा. तो महिलेशी शारीरिक जवळीक साधण्याचा प्रयत्न करायचा. तो जाणीवपूर्वक माझ्या शरीराला स्पर्श करायचा. माझा हात पकडायचा. कधी कधी माझ्या खांद्यावर, मांडीवर हात ठेवायचा. मला या सगळ्या प्रकाराची खूप लाज वाटायची” असं पीडित महिलेने पोलिसांना सांगितलं.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...