Nashik Jobs|संकटात नोकरीची सुवर्णसंधी, कुठे अन् कशी होतेय भरती, जाणून घ्या!

| Updated on: Jan 08, 2022 | 7:02 AM

विहित नमुन्यातील अर्ज, मुलाखतीचा दिनांक, स्थळ, वेळ, दरमाह निश्चित वेतन तसेच अधिक माहिती विद्यापीठाच्या www.muhs.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Nashik Jobs|संकटात नोकरीची सुवर्णसंधी, कुठे अन् कशी होतेय भरती, जाणून घ्या!
job
Follow us on

नाशिकः एक अतिशय महत्त्वाची बातमी. नाशिकमध्ये नोकरीची सुवर्णसंधी निर्माण झालीय. त्यासाठी येत्या 10 आणि 11 जानेवारी रोजी मुलाखतीसाठी हजर रहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण लेफ्टनंट कमांडर ओंकार कापले यांनी केले आहे. तर मग कसला विचार करताय. ही संधी चुकवू नका. आवश्यक ती कागदपत्रे सोबत ठेवून मुलाखतीसाठी ठरल्यावेळी आणि ठरलेल्या दिवशी जरूर हजर रहा.

कोठे होतेय भरती?

नाशिकमधील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात कार्यालयीन कामकाजासाठी जिल्ह्यातील माजी सैनिक यांची तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्यात येणार आहे. याकरिता इच्छुक माजी सैनिक उमेदवारांनी मुलाखतीसाठी 10 व 11 जानेवारी 2022 रोजी हजर रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात वरिष्ठ सहायक या पदाच्या 10 जागा व विशेष कार्यकारी अधिकारी या पदाच्या 02 जागा भरण्यासाठी निश्चित वेतनावर तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्यात येणार आहे.

काय आहे पात्रता?

या पदांसाठी लेखा, आस्थापना आणि प्रशासन क्षेत्रातील कामकाजाचा अनुभव असलेल्या अर्हताधारक उमेदवारांची थेट मुलाखत घेवून निवड करण्यात येणार आहे. याबाबतचे विहित नमुन्यातील अर्ज, मुलाखतीचा दिनांक, स्थळ, वेळ, दरमाह निश्चित वेतन तसेच अधिक माहिती विद्यापीठाच्या www.muhs.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी आवश्यक त्या दस्तऐवजांच्या मूळ साक्षांकीत प्रति व विहित नमुन्यातील अर्जासह मुलाखतीच्या ठिकाणी स्वखर्चाने उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कमांडर ओंकार कापले यांनी केले आहे. मग, कसला विचार करताय. लागा तयारीला आणि या अतिशय चांगल्या संधीचा जरूर लाभ घ्या.

संकटात संधी

एकीकडे कोरोनामुळे अनेक ठिकाणी नोकर भरती बंद करण्यात आली आहे. कित्येकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. मात्र, नाशिक जिल्ह्यात माजी सैनिकांना ऐन संकटात ही संधी चालून आहे. याशिवाय इतर कंपन्यातही सातत्याने नोकर भरती सुरू आहे. या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

नाशिकमधील आरोग्य विज्ञान विद्यापीठात कार्यालयीन कामकाजांसाठी माजी सैनिकांची भरती करण्यात येणार आहे. ही नोकरभरती तात्पुरत्या स्वरुपाची आहे. ज्यांना या संधीचा लाभ घ्यायचा आहे, त्या उमेदवारांनी आपली मूळ कागदपत्रे घेऊन ठरलेल्या दिवशी मुलाखतीसाठी आवश्यक यावे.
– ओंकार कापले, लेफ्टनंट कमांडर, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी

इतर बातम्याः

Nashik Train|आनंदवार्ता: नाशिक-भुसावळ-इगतपुरी मेमू 10 जानेवारीपासून होणार सुरू

Gold Price|ओ मेरे सोना रे, सोना रे, सोना…भावात चक्क 600 रुपयांची घसरण, चांदीही 60 हजारांखाली!

Nashik Omicron| कोरोनाची वावटळ; रुग्णसंख्या 2 हजारांच्या घरात, कारभारी बाहेर पडताना जरा जपून…!