AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी लव्ह बाईट, नंतर दारू, सिगारेट पाजून कपडे… तरुणीवर लॉजमध्ये लैंगिक अत्याचार; आणखी एका प्रकाराने नाशिक हादरले

नाशिकमधून आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका तरुणीला तरुणाने प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. तिला लॉजवर नेऊन दारु पाजली. त्यानंतर तिचे कपडे काढून नको तसे फोटो आणि व्हिडीओ शूट केला.

आधी लव्ह बाईट, नंतर दारू, सिगारेट पाजून कपडे... तरुणीवर लॉजमध्ये लैंगिक अत्याचार; आणखी एका प्रकाराने नाशिक हादरले
Nashik CrimeImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Apr 19, 2026 | 12:18 PM
Share

भोंदू खरात प्रकरणानंतर नाशिकमध्ये लैंगिक अत्याचार आणि बळजबरी धर्मांतराच्या प्रयत्नाचे आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. पंचवटी पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनुसार, एका तरुणाने तरुणीला विविध ठिकाणी फिरवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर तिच्या गळ्यातील तुळशीमाळ आणि हातावरील धागे काढून, तिला एका विशिष्ट धर्माच्या रिवाजाप्रमाणे ‘गजरा हिंद’ करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.

संशयित आरोपी तंजीर इनामदार याने पीडित तरुणीच्या संपर्कात आल्यानंतर तिच्या हातात हात घालून मिठी मारली, गळ्याजवळ चावा घेतला आणि त्याला ‘लव्ह बाईट’ म्हणून सांगितले. त्यानंतर मोबाइलमध्ये तिचे फोटो काढले. जानेवारी २०२६ मध्ये काढलेले हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने तिला जबरदस्तीने लॉजमध्ये नेले. तेथे दारू आणि सिगारेट पाजून तिचे कपडे काढले आणि बळजबरी लैंगिक अत्याचार केले. अत्याचारानंतर आरोपीने तिच्या गळ्यातील तुळशीमाळ आणि हातावरील धागे काढून, विशिष्ट धर्माच्या रिवाजाप्रमाणे ‘गजरा हिंद’ करण्यास सांगितले, अशी तक्रार पीडित तरुणीने पोलिसांकडे दिली आहे.

या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी आरोपी तंजीर इनामदारवर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. आरोपीच्या वकिलाने कोर्टात सांगितले की, “हे प्रेम प्रकरण आहे. फक्त एकदाच लॉजवर नेले गेले. ‘गजरा हिंद’ म्हणजे काय आणि त्याचा अर्थ काय, हे आम्हाला माहीत नाही.”

हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

भोंदू खरात प्रकरण ताजे असतानाच नाशिकमध्ये हे नवे प्रकरण समोर आल्याने हिंदुत्ववादी संघटना अधिक आक्रमक झाल्या आहेत. आमदार देवयानी फरांदे यांच्या नेतृत्वात आयटी कंपनीतील प्रकरणाविरुद्ध मोर्चा काढल्यानंतर, आता पंचवटीतील या प्रकरणावरूनही संघटनांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. काही संघटनांनी याला ‘लव्ह जिहाद’ असल्याचा आरोप केला आहे.

बजरंग दलाचे विभाग संयोजक श्रीकांत क्षत्रिय म्हणाले, “आरोपी आणि फिर्यादी दोघेही वेगळ्या धर्माचे आहेत. प्रेमाच्या जाळ्यात ओढून शोषण केले जात आहे. यामागे आर्थिक पाठबळ आहे का, याचा तपास व्हावा.”

पाच दिवसांची पोलीस कोठडी

पोलिसांनी आरोपीला पाच दिवसांची कोठडी दिली आहे. या काळात लॉजमधील प्रकार, ‘गजरा हिंद’ म्हणजे नेमके काय, आरोपीला पैसे कोठून मिळाले आणि यामागे कोणाचा आर्थिक पाठबळ आहे का? याचा सखोल तपास करण्यात येणार आहे. नाशिकमध्ये सलग दोन प्रकरणे समोर आल्याने शहरात तणावाचे वातावरण आहे. महिलांच्या सुरक्षिततेबाबत आणि धर्मांतराच्या प्रयत्नांबाबत प्रशासनाकडून कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...