Gold Rate Today | सोन्याचे दर गगनाला, दीड वर्षातली सर्वोच्च भाववाढ!

| Updated on: Mar 07, 2022 | 2:59 PM

जागतिक परिस्थितीच्या अस्थिरतेचे गंभीर फटके बसायला सुरुवात झाली आहे. येणाऱ्या काळात पेट्रोल, डिझेलपासून सारेच इंधन महागण्याची भीती व्यक्त होत आहे. शेअर बाजार कोसळत आहे. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे सोन्याचे दर पुन्हा एकदा वाढताना दिसून येतायत.

Gold Rate Today | सोन्याचे दर गगनाला, दीड वर्षातली सर्वोच्च भाववाढ!
gold
Follow us on

नाशिकः जागतिक परिस्थितीच्या अस्थिरतेचे गंभीर फटके बसायला सुरुवात झाली आहे. येणाऱ्या काळात पेट्रोल, डिझेलपासून सारेच इंधन महागण्याची भीती व्यक्त होत आहे. शेअर बाजार कोसळत आहे. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे सोन्याचे (Gold) दर पुन्हा एकदा वाढताना दिसून येतायत. नाशिकमध्ये (Nashik) सोमवारी गेल्या दीड वर्षातली सर्वोच्च भाववाढ नोंदवली गेली. त्यात 24 कॅरेट सोन्याचे दर हे दहा ग्रॅमच्या मागे जीएसटीसह (GST) 55 हजार रुपये नोंदवले गेले. येणाऱ्या काळात सोन्याचे दर अजून वाढतील, अशी शक्यता दी नाशिक सराफ असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश नवसे यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना व्यक्त केली. आता तोंडावर लगीन सराई आहे. याचा फटका अनेकांना बसणार आहे.

कसे आहेत दर?

नाशिकमध्ये सोमवारी 24 कॅरेट सोन्याचे दर दहा ग्रॅमच्या मागे जीएसटीसह 55 हजार रुपये नोंदवले गेले. तर 22 कॅरेट सोन्याचे दर दहा ग्रॅमच्या मागे जीएसटीसह 51 हजार रुपये नोंदवले गेले. चांदीच्या दरातही वाढ झालेली दिसली. चांदीचे दर किलोमागे 71 हजार रुपये नोंदवल्याची माहिती गिरीश नवसे यांनी दिली. विशेष म्हणजे आता येणाऱ्या काळात लग्न समारंभ सुरू होतील. त्यात अजून दर वाढतील, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली.

का वाढतायत दर?

सध्या रशिया-युक्रेन युद्ध सुरू आहे. त्याचा फटका साऱ्या जगाला बसतो आहे. येणाऱ्या काळात इंधनाच्या किमती वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. पेट्रोल आणि डिझेल भाव वाढले, तर आपसुकच महागाई वाढणार. कारण वाहतूक खर्च वाढल्याचा परिणामाची झळ प्रत्येक क्षेत्राला बसेल. सध्या जागतिक अस्थिरतेमुळे शेअर बाजार टिकाव धरताना दिसत नाही. त्यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून पुन्हा एकदा सारेच सोन्याकडे वळले आहेत. त्यामुळे सोने महाग होत आहे.

असे जाणून घ्या दर

तुम्ही दररोज घरबसल्या सोन्याचा भाव जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक संदेश येईल, ज्यामध्ये तुम्ही सोने आणि चांदीचे नवे दर पाहू शकता.

सोन्याचे दर

मुंबई
– 24 कॅरेट सोने – 53890
– 22 कॅरेट सोने – 49400

पुणे
– 24 कॅरेट सोने – 53950
– 22 कॅरेट सोने – 49480

नागपूर
– 24 कॅरेट सोने – 53940
– 22 कॅरेट सोने – 49450

नाशिक
– 24 कॅरेट सोने – 55000
– 22 कॅरेट सोने – 51000

इतर बातम्याः

ऐतिहासिक नाशिकला स्मार्ट सिटीचा चूड; गोदाघाट उद्धवस्त करून मंदिरे तोडली, आंदोलन पेटणार!

युक्रेनमधले 16 विद्यार्थी सुखरूप परतले; नाशिककरांच्या आनंदाला पारावार नाही, वाजत-गाजत स्वागत!

अर्थमंत्री विरुद्ध ऊर्जामंत्री वादाचा 2 लाख 50 हजार उद्योजकांना फटका, या अधिवेशनात तरी तोडगा निघणार का?