Photo Gallery: नाशिक-मुंबई महामार्गावर अपघात; वाहतुकीचा खोळंबा

| Updated on: Mar 29, 2022 | 10:04 AM

नाशिक-मुंबई महामार्गावर झालेल्या अपघाताने वाहतुकीचा खोळंबा झाला. त्यामुळे सध्या एकेरी मार्गाने वाहतूक सुरू आहे.

1 / 4
मुंबई - नाशिक महामार्गावर मुंबईहून नाशिकच्या दिशेने जात असताना पिंपरी फाटा येथील गतिरोधकवर कंटेनरला (HR.55 AJ.0302) पाठीमागून येणाऱ्या पिकअप व्हॅनने (MH. 04 JK. 8948) जोरदार धडक दिली. त्यामुळे काही काळ मार्गावरील सर्व वाहतूक बंद झाली होती.

2 / 4
नाशिक-मुंबई महामार्गावरील अपघाताची बातमी समजताच महामार्ग पोलिस घोटी केंद्र, रूट पेट्रोलिंग टीमने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमी झालेल्या पिकअप चालकाला पुढील उपचारासाठी तातडीने इगतपुरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

3 / 4
मुंबई-नाशिक महामार्गावर भल्या पहाटे झालेल्या या अपघाताने किती तरी वेळ वाहतुकीचा खोळंबा झाला. एकीकडे अजून अंधार कायम होता. त्यात वेगाने येणाऱ्या वाहनांना अचानक थांबावे लागायचे. समोरील अपघातग्रस्त वाहने पाहून अनेक चालकांच्या काळजाचा ठोका चुकला होता.

4 / 4
अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक खोळंबली आहे. पोलिसांनी सध्या एकेरी मार्गाने वाहतूक सुरू करण्याचा पर्याय निवडला आहे. मात्र, वाहतुकीची गती मंद आहे. याचा फटका अनेकांना बसणार आहे. वाहने लवकरात लवकर घटनास्थळावरून बाजूला नेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.