AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने चक्क बनावट व्हॉट्सॲप खाते, थायलंडच्या नंबरवरून तो मॅसेज … मग घडलं काय?

काही अज्ञात व्यक्तींनी आयुष प्रसाद यांच्या नावाने एक अकाऊंट ओपन करण्यात आले. या अकाऊंटवरुन पैशांची मागणी देखील करण्यात आली आहे. हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने चक्क बनावट व्हॉट्सॲप खाते, थायलंडच्या नंबरवरून तो मॅसेज ...  मग घडलं काय?
WhatsappImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Sep 15, 2026 | 11:22 AM
Share

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या नावाचा, पदाचा आणि अधिकृत फोटोचा गैरवापर करून बनावट बिझनेस व्हॉट्सॲप अकाउंट तयार करण्यात आल्याची गंभीर घटना निदर्शनास आली आहे. परदेशी क्रमांकावरून नागरिकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात असून, प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, काही अज्ञात व्यक्तींनी आयुष प्रसाद यांचे नाव, जिल्हाधिकारी पद आणि त्यांचा फोटो वापरून बनावट व्हॉट्सॲप बिझनेस अकाउंट उघडले आहे. या अकाउंटवरून थायलंडसारख्या परदेशी क्रमांकावरून संदेश पाठवले जात आहेत. संदेशांमध्ये “Hello… How are you doing… Where are you at the moment?” अशा स्वरूपाची सामान्य आणि अनौपचारिक चौकशी केली जात आहे. यामुळे सामान्य नागरिकांना संभ्रम होण्याची शक्यता आहे.

प्रशासनाने दिले स्पष्टीकरण

जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे की जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या वतीने कधीही अशा प्रकारे परदेशी क्रमांकावरून संदेश पाठवले जात नाहीत. कोणत्याही अधिकृत कामासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून केवळ अधिकृत माध्यमांतूनच संपर्क साधला जातो. बनावट अकाउंटद्वारे आर्थिक फसवणूक किंवा इतर गैरप्रकारांचा प्रयत्न होऊ शकतो, अशी शक्यता नाकारता येत नाही.

या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नाशिक जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की सदर परदेशी क्रमांकावरून येणाऱ्या कोणत्याही संदेशाला, कॉलला किंवा व्हॉट्सॲप संदेशाला प्रतिसाद देऊ नये. अशा संदेशांना उत्तर देणे टाळावे आणि शक्य असल्यास संबंधित क्रमांक ब्लॉक करावा. कोणतीही संशयास्पद माहिती आढळल्यास ताबडतोब जिल्हाधिकारी कार्यालय किंवा स्थानिक पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.

प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली असून, बनावट अकाउंट बंद करण्यासाठी संबंधित यंत्रणांकडे तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे कळते. नागरिकांनी सतर्क राहून अशा बनावट संपर्कांपासून स्वतःचे संरक्षण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे. ही घटना डिजिटल युगात अधिकाऱ्यांच्या ओळखीचा गैरवापर कसा होऊ शकतो, याचे उदाहरण आहे. नागरिकांनी अधिकृत माहितीसाठी नेहमी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळाचा किंवा जाहीर सूचनांचा आधार घ्यावा.

Follow Us
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील नेत्याची मोठी प्रतिक्रिया; नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील नेत्याची मोठी प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाले?
दिशा सालियान प्रकरणात मोठा ट्विस्ट? CBI च्या FIR मध्ये ठाकरे...
मोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणात नवा ट्वीस्ट? CBI च्या FIR मध्ये ठाकरेंचं नाव नाहीच...
शिवसेना कुणाची? आज कोर्टात निर्णायक सुनावणी? शिंदेंचे वकील करणार...
शिवसेना कुणाची? आज कोर्टात निर्णयाक सुनावणी... शिंदेंचे वकिल करणार युक्तिवाद
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी नाकारली तरी मनोज जरांगे ठाम
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना दिले महत्त्वाचे आवाहन
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
Lalbag Cha Raja : अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही उपस्थित
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी..
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी घेतले गणपती बाप्पांचे दर्शन
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?