AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ती गोष्ट लपवली…रिसॉर्टमध्ये नेत जबरदस्ती, मग धर्मांतरणासाठी…टीसीएसमधील पीडितेची आपबित्ती, अंगावर काटाच येईल

Nashik IT Company Molestation Case: टीसीएसमध्ये धर्मपरिवर्तन आणि लैंगिक शोषणप्रकरणात दिवसागणिक एका मागून एक खुलासे होत आहे. टीसीएसमधील पीडितेने याविषयीची आपबित्ती समोर आणली आहे. ती ऐकताच अंगावर काटाच येईल.

ती गोष्ट लपवली...रिसॉर्टमध्ये नेत जबरदस्ती, मग धर्मांतरणासाठी...टीसीएसमधील पीडितेची आपबित्ती, अंगावर काटाच येईल
| Updated on: Apr 21, 2026 | 12:18 PM
Share

Nashik IT Company Molestation Case: नाशिक येथील टीसीएस कंपनीच्या कार्यालयात मोठे कांड झाले. धर्मांतरण आणि लैंगिक शोषणाचा मोठा आरोप झाला. याप्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे होत आहे. एका पीडितेने पोलिसांना तिची आपबित्ती सांगितली. तिच्या मते, आरोपीने त्याचे लग्न झाले आहे ही गोष्ट लपवली. त्याने रिसॉर्टवर जाऊन तिच्याशी जबरदस्ती केली. तिचे लैंगिक शोषण केले. त्यानंतर धर्मांतरणासाठी तिच्यावर सातत्याने दबाव आणला. पीडितांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यात अनेक नवनवीन खुलासे समोर येत आहे. एका कॉर्पोरेट कंपनीत इतका गंभीर प्रकार होत असताना वरिष्ठ झोपले होते का? असा सवाल विचारल्या जात आहे.

कॉलेजमध्ये झाली ओळख

पीडितेने केलेल्या खुलाश्यानुसार, ती चार वर्षांपूर्वी या आरोपींपैकी एकाच्या संपर्कात आली होती. ती तेव्हा कॉलेजमध्ये शिकत होती. तेव्हा आरोपींशी तिची ओळख झाली. एजन्सीनुसार, आरोपीने पदवीनंतर टीसीएसमध्ये नोकरी विषयी तिच्यासी चर्चा केली होती. जुलै 2022 मध्ये त्याने पीडितेसोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. तो अगोदरच विवाहित होता. पण त्याने ही गोष्ट लपवली. त्याने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवत अत्याचार केला.

पीडितेला टीसीएस कंपनीत नोकरी मिळाली. आरोपीही तिथेच नोकरीला होता. ऑगस्ट 2024 मध्ये आरोपी तिला एका रिसॉर्टमध्ये घेऊन गेला. त्याने तिथे तिच्याशी जबरदस्ती केली. तिचे लैंगिक शोषण केले. फेब्रुवारी 2026 मध्ये आरोपीचे लग्न झालेले आहे हे तिला कळले. त्याला दोन मुलं असल्याची माहिती मिळाली. आरोपीच्या पत्नीनेच पीडितेशी संपर्क करून ही माहिती दिली.

देवी-देवतांविषयी अवमानकारक वक्तव्य

पीडिता आणि आरोपी हे कंपनीच्या कॅन्टिनमध्ये जात. तेव्हा त्याचे मित्रही तिथे येते. हे तिघेही हिंदू देवी-देवतांविषयी अत्यंत अश्लाघ्य भाषेत टिप्पणी करायचे. हिंदू धर्माची खिल्ली उडवायचे. तसेच त्यांच्या धर्माविषयी माहिती द्यायचे. तिच्यावर धर्मांतरणासाठी हे तिघेही दबाव टाकत असल्याचा दावा पीडितेने केला आहे. तर पीडितेने जेव्हा आरोपीला त्याच्या पत्नीचा फोन आल्याची माहिती दिली, तेव्हा त्याने तुझ्याशी लग्न करण्याचा इरादाच नसल्याचे सांगितले. तर इतर आरोपी हे तिला त्याच्याशी संबंधावर लैंगिक छळ करत होते. तसेच तिला ब्लॅकमेल करत असल्याची आपबित्ती तिने सांगितली.

निदा खान सापडणार कधी?

तर या प्रकरणात मुलींना जाळ्यात ओढणारी आणि धर्मांतरणासाठी दबाव टाकणारी मास्टरमाईंड निदा खान अजूनही पोलिसांच्या हाती लागलेली नाही. ती भिवंडीत तर कधी ठाण्यात अशी लोकेशन बदलवत आहे. त्याचवेळी तिने अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला आहे. तिच्या जामीनावर सोमवारी सुनावणी होईल. ती दोन महिन्यांची गरोदर असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्याची शहानिशा पोलीस करत आहे. अटकेपासून वाचण्यासाठी तिने हा बनाव केल्याचाही दावा करण्यात येत आहे. ती दहशतवाद्यांच्या स्लीपर सेलची सदस्य तर नाही ना? या दिशेने तपासाची चक्र फिरत असल्याचे समजते.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...