AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाशिक मनपात तिन्ही पक्षांचा एकला चलोचा नारा, आघाडीत बिघाडी निश्चित?

नाशिकमध्ये महाविकास आघाडीचे पक्ष एकमेकांविरोधात उभे टाकण्याची शक्यता वर्तवली जातेय. (nashik municipal election congress)

नाशिक मनपात तिन्ही पक्षांचा एकला चलोचा नारा, आघाडीत बिघाडी निश्चित?
| Updated on: Dec 26, 2020 | 4:47 PM
Share

नाशिक : राज्यात महाविकास आघाडी म्हणून  काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष एकदिलाने काम करत असताना नाशिकमध्ये मात्र हेच पक्ष एकमेकांविरोधात उभे टाकण्याची शक्यता वर्तवली जातेय. शनिवारी (26 डिसेंबर) येथे काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी ‘एकला चलो’च्या भूमिकेवर जोर दिल्याने पेच आणखी वाढण्याची शक्यता वर्तविली जातेय. (nashik municipal corporation election congress Will contest independently)

नाशिक शहरात काँग्रेसच्या स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांची शनिवारी बैठक झाली. या बैठकीत आगामी महापालिकेच्या निवडणुकीवर सखोल चर्चा झाली. यावेळी जिंकण्याची शक्यता तसेच, बलस्थानांवर खलबतं झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, आगामी महापालिका निवडणुकीत कुणाशीही आघाडी न करता स्वतंत्ररीत्या लढवण्याची मागणीही काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी यावेळी  केली. काँग्रेसच्या याच भूमिकेमुळे आता नाशिकच्या महाविकास आघाडीला खिंडार पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आगामी महोपौर काँग्रेसचाच होणार

काँग्रेसने आयोजित केलेल्या या बैठकीत काँग्रेसच्या आमदारांसोबतच अनेक स्थानिक नेते अपस्थित होते. यावेळी स्थानिक नेते आणि नगरसेवकांनी निवडणूक महापालिका आघाडीत लढवण्यास विरोध केला. तर आमदार हिरामण खोसकर यांनी नाशिक महानगरपालिकेचा आगामी महोपौर हा काँग्रेसचाच असणार असा ठामपणे दावा केला.

महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांकडून महापौरपदावर दावा

दरम्यान, आज (शनिवार 26 डिसेंबर) काँग्रेससोबतच शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांचीही स्वतंत्रपणे बैठक झाली. यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनीही आघाडीमध्ये निवडणूक न लढवता स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची मागणी केली. तसेच, या बैठकीत शिवसेनेनेही स्वबळाचा नारा देत महापालिकेचा महोपौर फक्त शिवसेनेचाच असेल असा दावा केला. राष्ट्रवादीनेही यापूर्वीच स्वबळावर लढणार असल्याचं सांगितलेलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांनी स्वबळाचा नारा दिल्यामुळे नाशिकमधील आगामी राजकीय गणितं काय असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

शिवसेनेकडून स्वबळावर लढण्यासाठी चाचपणी

काँग्रेससोबतच येथील शिवसेना कार्यालयात शहरातील पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत शिवसेनेकूडन स्वबळावर लढण्यासाठीची चाचपणी केल्याची सूत्रांची माहिती आहे. त्याचबरोबरच मागील निवडणुकीत झालेल्या पराभवाची मिमांसा या बैठकीत केली गेली. दरम्यान, आगामी महापालिका निवडणूक स्वबळावरच लढवावी अशी मागणी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या मागणीवर पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या बैठकीला शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, महापालिकेचे विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, विजय करंजकर आदी नेते उपस्थित होते.

संबंधित बातम्या :

चंद्रकात पाटील म्हणजे चंपारण्यातील पात्र : वडेट्टीवार

नाशकात शिवसेनेची स्वबळाची चाचपणी, काँग्रेसचीही बैठक, मविआचं काय होणार?

…तर प्रवाशांना त्यांच्या खर्चाने क्वारंटाईन करुन काय साधणार?, अबू आझमींचे उद्धव ठाकरेंना पत्र

(nashik municipal corporation election congress Will contest independently)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...