VIDEO | ‘भावपूर्ण श्रद्धांजली’च्या होर्डिंग्जने मानसिकतेवर परिणाम, पोस्टर न लावण्याचं आवाहन

कोरोनासह इतर आजाराने मृत्यू पावलेल्या आप्तांना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांचे नातेवाईक, मित्र रहदारीच्या रस्त्यांवर श्रद्धांजलीचे बोर्ड्स किंवा फ्लेक्स लावतात (obituary hoardings Corona pandemic)

VIDEO | 'भावपूर्ण श्रद्धांजली'च्या होर्डिंग्जने मानसिकतेवर परिणाम, पोस्टर न लावण्याचं आवाहन
श्रद्धांजली वाहणारे पोस्टर
Follow us
| Updated on: May 03, 2021 | 2:42 PM

मनमाड : श्रद्धांजलीचे फ्लेक्स पाहून नागरिकांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होत आहेत. त्यामुळे शहरात ‘भावपूर्ण श्रद्धांजली’ अर्पण करणारे होर्डिंग्ज न लावण्याचे आवाहन नाशिक जिल्ह्यातील नांदगाव नगर परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे. कोव्हिड संसर्गाच्या काळात अनेकांच्या मनात धास्तीचं वातावरण पसरलेलं आहे. अशावेळी कोणाचंही मनोधैर्य खालावेल असे श्रद्धांजलीचे होर्डिंग्ज लावू नका, असं आवाहन करण्यात येत आहे. (Nashik Nandgaon Nagar Parishad appeals not to put obituary hoardings during Corona pandemic)

श्रद्धांजलीचे होर्डिंग्ज

कोरोनासह इतर आजाराने मृत्यू पावलेल्या आप्तांना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांचे नातेवाईक, मित्र रहदारीच्या रस्त्यांवर श्रद्धांजलीचे बोर्ड्स किंवा फ्लेक्स लावतात. होर्डिंग लावणाऱ्या व्यक्तींचा हेतू निश्चितच वाईट नसतो, मात्र सध्या नकारात्मकतेचं वातावरण पसरलं असताना ते पाहणाऱ्या नागरिकांच्या मानसिकतेवर मात्र विपरित परिणाम होत आहेत. त्यामुळे शहरात भावपूर्ण श्रद्धांजलीचे होर्डिंग्ज न लावण्याचे आवाहन नांदगाव नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव सर्वत्र वाढल्याने शहरातील अनेक जणांना आपले जीव गमवावे लागले आहेत. कोरोना हा संसर्गजन्य आजार असल्याने दिवंगत व्यक्तीच्या कुटुंबीयांचेही सांत्वन करण्यासाठीही कोणाला जाता येत नाही. अशा वेळी जवळच्या माणसाला कोरोनाने अकाली हिरावल्याचे दुःख व्यक्त करण्यासाठी त्याचे मित्र, नातलग यांच्याकडून दिवंगतांना इतर मार्गाने श्रद्धांजली वाहिली जाते. (obituary hoardings Corona pandemic)

लक्ष वेधणारे मोठे होर्डिंग्ज

रहदारीच्या ठिकाणी होडिंग्ज लावून भावपूर्ण श्रद्धांजली दिली जाते. मृतांची संख्या जास्त असल्याने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करणाऱ्या होर्डिंग्जची संख्याही वाढली असून रहदारीच्या ठिकाणी असे फ्लेक्स नागरिकांचे लक्ष आपसूक वेधून घेतात. कोरोनाने त्रस्त असताना श्रद्धांजलीच्या होर्डिंग्ज बघून नागरिकांच्या मानसिकतेवर विपरित परिणाम होत आहेत. त्यांची मनस्थिती खालावत असल्याने असे होर्डिंग्ज न लावण्याचे आवाहन नांदगाव नगर परिषदेचे नगराध्यक्ष राजेश कवडे आणि मुख्याधिकारी पंकज गोसावी यांनी पत्रकाद्वारे केले आहे.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

आईपाठोपाठ मुलाचाही मृत्यू, वीस दिवसात वडिलांचं निधन, कोरोनाने कुटुंब संपवलं

कोरोनाने कुटुंबाचे दोन आधारस्तंभ निखळले, उस्मानाबादेत पत्रकार भावांचा मृत्यू

पूजेनिमित्त एकत्र येणारं जाधव कुटुंब 15 दिवसात कोरोनाने संपवलं, पुणेकरांनो सावध व्हा

(Nashik Nandgaon Nagar Parishad appeals not to put obituary hoardings during Corona pandemic)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.