AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी तुमच्या बहिणीला पुढे आणा… राहुल गांधींविरोधात भाजपचं जोरदार आंदोलन, काळ्या फिती लावून घोषणाबाजी

काँग्रेसने नारी वंदन विधेयकाला विरोध केल्यानंतर आज राहुल गांधी नाशिकमध्ये जात असल्याचे कळताच भाजप महिला पदाधिकाऱ्यांनी निषेद नोंदवला आहे.

आधी तुमच्या बहिणीला पुढे आणा... राहुल गांधींविरोधात भाजपचं जोरदार आंदोलन, काळ्या फिती लावून घोषणाबाजी
Rahul GandiImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Sep 02, 2026 | 11:41 AM
Share

काँग्रेस नेते राहुल गांधी आज नाशिक दौऱ्यावर असताना शहरात राजकीय वातावरण तापले आहे. एकीकडे काँग्रेसचे शिबिर आणि राहुल गांधींच्या कार्यक्रमाची तयारी सुरू असताना दुसरीकडे भाजप आक्रमक भूमिका घेत निषेध आंदोलन करत आहे. नारी वंदन विधेयकाला काँग्रेसने विरोध केल्याबद्दल भाजप नाशिकने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निषेध आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनात भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला आहे. भाजप महिलांनी काळे कपडे घालून डोक्याला काळ्या फिती बांधल्याचे चित्र दिसत आहे.

महिलांची घोषणाबाजी

भाजपने स्पष्ट केले आहे की, काँग्रेसने नारी वंदन विधेयकाला विरोध केल्याने पक्ष काळे कपडे परिधान करून आणि काळ्या फिती लावून निषेध व्यक्त करणार आहे. राहुल गांधी नाशिकमध्ये असतानाच भाजप नारी वंदन विधेयकाच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरणार असल्याने शहरात राजकीय चुरस वाढली आहे. भाजपचे नेते म्हणतात की, महिला सक्षमीकरणासाठी आणलेल्या महत्त्वाच्या विधेयकाला काँग्रेसने विरोध केला, त्यामुळे पक्ष जनतेसमोर ही बाब मांडणार आहे. भाजपमधील काही महिलांनी राहुल गांधींना विरोधात घोषणाबाजी केली आहे. एका महिला पदाधिकाऱ्याने ‘आधी तुमच्या बहिणीला तुम्ही राजकारणात पुढे आणा’ असे म्हटले आहे.

रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे ताफ्याला अडचणी

दुसरीकडे राहुल गांधींच्या दौऱ्यात एक वेगळीच घटना समोर आली. नाशिक विमानतळावरून काँग्रेसच्या शिबिराच्या ठिकाणी जात असताना त्यांचा ताफा म्हसरूळ-मखमलाबाद परिसरातून खड्ड्यातून प्रवास करत होता. रस्त्यांची दुरवस्था असल्याने ताफ्याला अडचणींचा सामना करावा लागला. या घटनेमुळे शहरातील रस्त्यांच्या स्थितीबाबतही चर्चा सुरू झाली आहे. नागरिकांनी सोशल मीडियावर रस्त्यांच्या खड्ड्यांबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

नाशिकमध्ये एकाच वेळी दोन राजकीय घडामोडी घडत असल्याने शहरातील राजकीय वातावरण तापलेले आहे. एकीकडे काँग्रेस आपला कार्यक्रम यशस्वी करण्याचा प्रयत्न करत आहे, तर दुसरीकडे भाजप निषेध आंदोलनाद्वारे दबाव वाढवणार आहे. नारी वंदन विधेयकाच्या मुद्द्यावरून दोन्ही पक्ष आमनेसामने आल्याने पुढील काही तास महत्त्वाचे ठरणार आहेत.

Follow Us
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच
ब्रिक्स परिषदेसाठी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान भारतात दाखल!
BRICS Summit 2026 | ब्रिक्स परिषदेसाठी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान भारतात दाखल! आज पंतप्रधान मोदींसोबत काय होणार चर्चा?