
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेत (Navi Mumbai Municipal Corporation) प्रथमच तीन नगरसेवक निवडले जाणार आहेत. नवी मुंबई महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 19 मध्ये OBC आरक्षण लागू झाले आहे. असे असले तरी प्रभाग क्रमांक 19 मध्ये प्रदीर्घ काळ नगरसेवक म्हणून विजयी होणारे सुधाकर संभाजी सोनवणे हे सेफ झोन मध्ये आहेत.
प्रभाग क्रमांक 19 मध्ये सुधाकर संभाजी सोनवणे हे अनेकवेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. अनुसूचित जातीच्या प्रवर्गातून ते निवडणुक लढवतात. हा प्रभाग महिलांसाठी राखीव झाल्यास त्यांच्या पत्नी आणि मुलीने अनेकदा निवडणुक लढवली आहे. सुधाकर सोनवणे यांनी नवी मुंबई महापालिकेचे महापौरपद देखील भूषवले आहे.
नवीन प्रभाग रचनेनुसार एका प्रभागातून तीन नगरसेवक निवडले जाणार आहेत. त्यामुसार प्रभाग क्रमांक 19 मध्ये आता प्रभाग क्रमांक 19 अ, प्रभाग क्रमांक 19 ब आणि प्रभाग क्रमांक 19 क असे तीन प्रभाग असणार आहेत. यापैकी प्रभाग क्रमांक 19 अ हा OBC उमेदवारासाठी आरक्षित करण्यात आला आहे. प्रभाग क्रमांक 19 ब हा सर्व साधारण महिला उमेद्वाराकरीता आरक्षित करण्यात आला आहे. तर प्रभाग क्रमांक 19 क सर्वसाधारण खुल्या गटासाठी राखीव ठेवण्यात आला आहे.
| पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
|---|---|---|
| शिवसेना | ||
| भाजप | ||
| राष्ट्रवादी | ||
| काँग्रेस | ||
| मनसे | ||
| इतर आणि अपक्ष |
यामुळे सुधाकर सोनावणे हे प्रभाग क्रमांक 19 क सर्वसाधारण खुल्या गटातुन निवडणुकीच्या रिंगणाच उतरु शकतात. मात्र, प्रभाग रचनेचा फटका सुधाकर सोनावणे यांना बसू शकतो. कारण ते रबाळे विभागातील नगरसेवक आहेत. रबाळे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर झोपडपट्टी वसाहतीती सोनावणे यांनी अनेक विकास कामं केली आहेत. मात्र, नविन प्रभाग रचनेनुसार त्यांचा प्रभाग कोपरखैरणे परिसरात गेला आहे.
प्रभाग क्रमांक 19 ची एकूण लोकसंख्या 25043 इतकी आहे. अनुसूचित जातीचे 839 मतदार आहेत. तर 144 मतदार हे अनुसूचित जमातीचे आहेत.
| पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
|---|---|---|
| शिवसेना | ||
| भाजप | ||
| राष्ट्रवादी | ||
| काँग्रेस | ||
| मनसे | ||
| इतर आणि अपक्ष |
व्याप्ती – कोपरखैरणे सेक्टर-14, सेक्टर-15 (भाग), सेक्टर 16 (भाग), सेक्टर 22, सेक्टर 23 सेक्टर -17 (भाग) व इतर.
उत्तर- नपुंमपाच्या पश्चिम बाजुकडील, ठाणे खाडीच्या हद्दीपासुन पुर्वेस अजंठा को.हौ. सो. प्लॉट नं. 16/17, सं. 22, पुढे पुर्वेस जिमी टॉवर पर्यंत.
पूर्व – जिमी टॉवर पासुन दक्षिणेस साई कृपा ओनर्स अशोसिएशन से 18, पुढे पश्चिमेस रूम नं. 876 से. 18, पुढे दक्षिणेस रूम नं. 513, से. 17, पुढे पूर्वेस रूम नं. 66, से. 17, पुढे दक्षिणेस रूम नं. 45, से.17, पुढे पश्चिमेस रूम नं. 86 से. 17, दक्षिणेस रूम नं. 77 से. 17, पुढे पूर्वेस रूम नं. 55, से. 17, पुढे दक्षिणेस रूम नं. 672, से.16, पुढे पुर्वेस रूम न 756, से. 16, पुढे उत्तरेस रूम नं. 746, से, 15, पुढे पूर्वेस 710 से. 15. पुढे दक्षिणेस रूम नं. 763, सं. 15, पुढे पूर्वेस एसएस३ रूम नं. 403, से. 15, पुढे उत्तरेस रूम नं. 380 से. 15, पुढे पूर्वेस आकाश पोलासो प्लॉट नं. 37 से 15 पुढे दक्षिणेस रोशन बंगलो प्लॉट नं. 64 से. 15, पढे पूर्वस लकी अपार्टमेंट प्लॉट नं. सं. 15, पुढे दक्षिणेस महावरी रतन से. 12 वाशी नाल्यावरील ब्रीजपर्यंत.
दक्षिण – नपुंमपाची ठाणे खाडी पश्चिम हद्द. (महावीर रतन से. 12 वाशी)
पश्चिम – नममपाची पश्चिम ठाणे खाडी हद्द
| पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
|---|---|---|
| शिवसेना | ||
| भाजप | ||
| राष्ट्रवादी | ||
| काँग्रेस | ||
| मनसे | ||
| इतर आणि अपक्ष |