Navi Mumbai Firing Case: घराबाहेर बोलावलं… सख्ख्या बहिणींवर धडाधड झाडल्या गोळ्या, कोपरखैरणेत ब्रेकअपच्या रागातून हल्ला? मुख्य आरोपीला अटक

Navi Mumbai Firing Case: नवीन मुंबईत दोन मुलींवर गोळीबार करण्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली. कोपरखैरणेत घडलेल्या या घटनेचे कारण समोर आले आहे. मुख्य आरोपी अर्जुन चव्हाणला अटक, साथीदार फरार आहे.

Navi Mumbai Firing Case: घराबाहेर बोलावलं... सख्ख्या बहिणींवर धडाधड झाडल्या गोळ्या, कोपरखैरणेत ब्रेकअपच्या रागातून हल्ला? मुख्य आरोपीला अटक
सख्ख्या बहिणींवर ब्रेकअपच्या रागातून हल्ला? मुख्य आरोपीला अटक, साथीदार फरार
| Updated on: Nov 06, 2026 | 7:35 AM

Kopar Khairane Firing Case: कोपर खैरणे येथील सेक्टर १ मधील SS3 परिसरात एका थरारक घटनेत दोन मुलींवर गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात एका मुलीच्या कानाजवळ, तर दुसर्‍या मुलीच्या पाठीत गोळी लागल्याने त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. दोन्ही जखमींवर तातडीने नवी मुंबई महानगरपालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच कोपरखैरणे पोलिसांनी तत्परता दाखवत मुख्य आरोपी अर्जुन चव्हाण (वय २२) याला तातडीने अटक केली. मात्र, त्याचा साथीदार राकेश चव्हाण हा घटनास्थळावरून फरार झाला असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. या गोळीबारामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, कोपरखैरणे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

ब्रेकअपच्या रागातून हल्ला झाल्याची घटना

Loading...

नवी मुंबईत ब्रेकअपच्या रागातून दोन सख्ख्या बहिणींवर गोळीबार घडल्याच्या या घटनेने खळबळ उडाली. नवी मुंबईतील कोपरखैरणे सेक्टर 1 मध्ये हा प्रकार घडला. रात्री ९ च्या सुमारास आरोपी आणि त्याच्या साथीदाराने तरुणीला घराबाहेर बोलवले. त्या दोघी दारातच असताना आरोपींनी त्यांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार केला. आरोपीने या मुलींवर ४ राऊंड फायर केले. 20 वर्षीय तरुणी ही गोळीबार करणाऱ्या आरोपीची माजी प्रेयसी असल्याची माहिती आता समोर येत आहे. ब्रेकअपच्या रागातूनच हा प्रकार घडल्याची माहिती समोर येत आहे. मुख्य आरोपी अर्जुन चव्हाण याला पोलिसांनी अटक केली आहे. तर त्याचा साथीदार अद्याप फरार आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.

तरुणी गंभीर जखमी, जेजे रुग्णालयात केले दाखल

या दोन्ही बहिणी घराच्या दारातच असताना आरोपीने काही कळायच्या आत त्यांच्या दिशेने धडाधड गोळ्या झाडल्या. त्यात 20 वर्षीय तरुणीच्या पाठीवर, तर 22 वर्षीय बहिणीच्या कानाजवळ गोळी लागली.एक्स प्रियकार २२ वर्षीय आरोपी अर्जुन चव्हाण याला पोलिसांकडून अटक करण्यात आली. दुसरा आरोपी राकेश चव्हाण फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. गंभीर जखमी 20 वर्षीय तरुणीवर मुंबईतील जेजे रुग्णालयात उपचार सुरू आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us