AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सत्ताधारीच आपापसात भिडले, भाजप-शिंदे गटात फ्री-स्टाईल हाणामारी, 3 जण जखमी

कल्याणच्या शहाड स्टेशन परिसरात नवरात्रीच्या बॅनरवरून भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. भाजपचे वॉर्ड अध्यक्ष मोहन कोणकर आणि शिंदे गटाचे मुकेश कोट यांसह काही जण जखमी झाले.

सत्ताधारीच आपापसात भिडले, भाजप-शिंदे गटात फ्री-स्टाईल हाणामारी, 3 जण जखमी
| Updated on: Sep 18, 2025 | 8:20 AM
Share

कल्याणच्या शहाड स्टेशन परिसरात नवरात्रीच्या बॅनरवरून सत्ताधारी भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. या हाणामारीत भाजपचे वॉर्ड अध्यक्ष मोहन कोणकर, शिंदे गटाचे मुकेश कोट आणि आणखी एक जण जखमी झाले आहेत. दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात खडकपाडा पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण आहे.

नेमकं काय घडलं?

हा वाद नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा बॅनरवरून सुरू झाला. शहाड स्टेशन परिसरात भाजपच्या वॉर्ड क्रमांक १५ चे अध्यक्ष मोहन कोणकर यांनी एक बॅनर लावण्यासाठी लोखंडी फ्रेम लावली होती. याच फ्रेमवर स्थानिक शिंदे गटाचे माजी नगरसेवक गणेश कोट यांचा मुलगा मुकेश कोट याने आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी स्वतःचा बॅनर लावला. यामुळे चिडलेल्या मोहन कोणकर यांनी याबाबत मुकेश कोटला जाब विचारला. याचवेळी दोघांमध्ये शाब्दिक चकमक सुरू झाली. या वादावादीचं रूपांतर हाणामारीत झालं. त्यानंतर दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांवर तुटून पडले.

जबरदस्त हाणामारी

या मारामारीत शिंदे गटाचे माजी नगरसेवक गणेश कोट यांचा मुलगा मुकेश कोट आणि त्याच्या साथीदारांनी मोहन कोणकर यांना मारहाण केली. यात मोहन कोणकर यांच्या डोक्याला आणि हाताला दुखापत झाली. मोहन कोणकर यांनीही प्रत्युत्तरादाखल मुकेश कोट यांना मारहाण केली. या झटापटीत मुकेश कोट आणि एक अनोळखी व्यक्तीही जखमी झाले. या घटनेनंतर परिसरातील वातावरण तापलं होतं. तसेच घटनास्थळी मोठी गर्दी जमली.

परस्परविरोधी गुन्हे दाखल

या घटनेनंतर मोहन कोणकर यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात मुकेश कोट आणि त्याच्या साथीदारांविरोधात तक्रार दाखल केली. तर मुकेश कोटनेही मोहन कोणकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांविरोधात मारहाणीची तक्रार दिली आहे. पोलिसांनी दोन्ही गटांच्या तक्रारींची नोंद घेऊन परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत. दरम्यान स्थानिक राजकारणात हाणामारीची ही घटना चर्चेचा विषय बनली आहे. विशेषतः एकाच आघाडीत असलेल्या पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या या राड्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

आणखी वाचा : 

मुंबई महापालिकेवर कोणाचा महापौर बसणार? एकनाथ शिंदे थेट नाव घेत म्हणाले…

तुमच्या घरात पूर्वजांचे फोटो कोणत्या दिशेला? लगेच बदला, नाहीतर येईल दुर्दैव!

Follow Us
धनुष्यबाण कुणाचं? शिवसेना पक्षचिन्हावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी,
धनुष्यबाण कुणाचं? शिवसेना पक्षचिन्हावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, नेमकं...
विठुरायाच्या दर्शनासाठी 3 दिवस प्रतीक्षा! पंढरपूर मंदिर बंद, कारण काय?
विठुरायाच्या दर्शनासाठी 3 दिवस प्रतीक्षा! पंढरपूर मंदिर बंद, कारण काय?
दिवाळीच्या प्रवासाचे नियोजन करताय? रेल्वे तिकीट बुकिंगमध्येच मोठा...
Diwali : दिवाळीत गावी जाण्याचा प्लॅन आहे? अत्ताच करा तयारी, नाही तर...
नवनीत राणांचा थेट कृषीमंत्री भरणेंना फोन, आधी लाऊडस्पीकरवर ठेवला मग...
नवनीत राणांचा थेट कृषीमंत्री भरणेंना फोन, आधी लाऊडस्पीकरवर ठेवला मग अचानक बंद का केला ??
तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत...
Lalbaugcha Raja : तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत तक्रार, अन् उद्या हायकोर्टात...
मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात!
Amit Thackeray : मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात! फडणवीसांचा जुना VIDEO दाखवत अमित ठाकरेंचा सवाल
मसाल्यांच्या बाजारात स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
Goldie Group : मसाल्यांच्या बाजारात गोल्डी ग्रुपचा नवा धमाका; स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोल...
Mumbai High Court : सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोलवाद्यांवरही कोर्टाचा दणका
दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले
Sanjay Shirsat : दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले; अंबादास दानवेंकडून VIDEO ट्विट करत शिरसाट यांच्यावर टीका
दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
NCP : दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं...