AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharad Pawar Hospitalized: शरद पवार पुन्हा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, नेमकं कारण काय?

Sharad Pawar Hospitalized: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्या चाचण्या सुरु आहेत.

Sharad Pawar Hospitalized: शरद पवार पुन्हा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, नेमकं कारण काय?
sharad-pawarImage Credit source: Tv9 Network
| Updated on: May 27, 2026 | 10:31 AM
Share

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, यात काळजीचे कोणतेही कारण नसून, ते केवळ नियमित वैद्यकीय तपासणीसाठी (रुटीन चेकअप) रुग्णालयात गेले आहेत.

नेमकं काय झालं?

वाढते वय आणि सततच्या राजकीय व सामाजिक व्यग्रतेमुळे शरद पवार यांच्या प्रकृतीची नियमित काळजी घेणे आवश्यक असते. याच पार्श्वभूमीवर, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्या काही आवश्यक वैद्यकीय तपासण्या ब्रीच कँडी रुग्णालयात केल्या जाणार आहेत.

लवकरच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता

शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत कोणतीही गंभीर बाब नाही. त्यांच्या नियमित चाचण्या पूर्ण झाल्यानंतर त्यांना लवकरच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे पक्षाचे कार्यकर्ते, नेते आणि राज्यभरातील त्यांच्या चाहत्यांनी प्रकृतीबाबत कोणतीही चिंता करू नये, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

यापूर्वीही रुग्णालयात दाखल झाले होते

यापूर्वी एप्रिल महिन्यातदेखील शरद पवार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शरद पवार दिल्लीहून आल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे उपचारासाठी त्यांना अॅडमिट करण्यात आले. दोन दिवसात डिस्चार्ज मिळणार होता मात्र डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्येच ठेवण्यात आले होते. यावेळी देखील रुटीन चेकअपमुळे शरद पवारांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Follow Us
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील...
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील गरबा उत्सवात रंगत!
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका...
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका बदलली? आता भारतात...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल महोत्सवाने किल्ला उजळला
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल