NCP News: इंडिया आघाडीत फूट! शरद पवारांचा काँग्रेस हायकमांडला संदेश? दिल्लीत मोठी घडामोड

राज्यसभेचे खासदार शरद पवार यांनी काँग्रेस हायकमांडला संदेश पाठवल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या खासदारांची भाजपशी चर्चा झाली असून ते विधेयकाच्या समर्थनात  उभे राहणार असल्याचा निरोप शरद पवार यांनी काँग्रेसला दिला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. 

NCP News: इंडिया आघाडीत फूट! शरद पवारांचा काँग्रेस हायकमांडला संदेश? दिल्लीत मोठी घडामोड
Sharad Pawar
| Updated on: Nov 27, 2026 | 9:07 PM

प्रमोद जगताप, प्रतिनिधी:  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देणार असल्याचे चित्र दिसत आहे. आमदार जिंतेंद्र आव्हाड यांनी विधेयकाला पाठिंबा देण्याचा निर्णय झाल्याचेही म्हटलं आहे. इंडिया आघाडीमधील महत्त्वाचे नेते असलेल्या शरद पवार यांनीच विरोधात भूमिका घेतल्याने आता काँग्रेस नेमकी काय भूमिका घेणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. अशातच आता दिल्लीमधून एक मोठी बातमी समोर आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते,  राज्यसभेचे खासदार शरद पवार यांनी काँग्रेस हायकमांडला संदेश पाठवल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या खासदारांची भाजपशी चर्चा झाली असून ते विधेयकाच्या समर्थनात  उभे राहणार असल्याचा निरोप शरद पवार यांनी काँग्रेसला दिला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

Loading...

सर्वात महत्त्वाचे म्हणजे शरद पवार यांनी या निर्णयामागील कारणही स्पष्ट केले आहे. पक्ष एकसंध ठेवण्यासाठी विधेयकाला समर्थन देण्याची वेळ आल्याची माहिती शरद पवार यांनी काँग्रेसला दिल्याचे विश्वसनीय सुत्रांनी म्हटलं आहे. एकीकडे काँग्रेस या विधेयकाविरोधात विरोधकांची मोट बांधत असतानाच शरद पवार यांनी घेतलेल्या भूमिकेने इंडिया आघाडीत मोठी फूट पडणार असल्याचे चिन्ह दिसत आहेत.

काय म्हणाले होते जितेंद्र आव्हाड? 

राष्ट्रवादी काँग्रेसकडून सर्वप्रथम जितेंद्र आव्हाड यांनी डिलिमिटेशनला पाठिंबा देण्याबाबत पक्षाची भूमिका मांडली होती. डिलिमिटेशनबाबत शरद पवार यांनी एकदा अनौपचारिक चर्चेत म्हणाले होते की, मतदारसंघ पुनर्रचना गरजेचे असते. डिलिमिटेशन हे घटनात्मक आहे, ते करावे लागते त्याला पर्याय नसतो असे मला साहेब म्हणाले होते. सुप्रिया सुळे यांचीही आठ खासदारांशी याबाबत चर्चा झाली आहे. डिलिमिटेशनला पाठिंबा देण्याचा आमचा निर्णय झाला असल्याचे जितेंद्र आव्हाड म्हणाले होते.  दुसरीकडे, राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हेंनी मात्र याबाबत निर्णय झाला नसल्याचे म्हटलं आहे. डिलिमिटेशन बिलाची प्रत हातात आल्यानंतर आम्ही निर्णय घेऊ असं अमोल कोल्हेंनी म्हटले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us