
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १२ मे २०२५ रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पाकिस्तानला दिलेल्या चोख प्रत्युत्तराबाबत देशाला संबोधित केले. यानंतर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी “ऑपरेशन सिंदूरचा सीझन-1 संपला, पुढच्या सीझनची प्रतीक्षा” असे ट्वीट केले होते. त्यांच्या या ट्विटरवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी जोरदार टीका केली आहे.
भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी एक ट्वीट केले होते. या ट्वीटमध्ये त्यांनी मोदींच्या भाषणाबद्दल भाष्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज रात्री आठ वाजता केलेल्या भाषणाचा अर्थ केवळ एवढाच आहे ‘ऑपरेशन सिंदूर’चा ‘सीझन-1’ संपलेला आहे पुढच्या ‘सीझन’ची भारतीयांना प्रतीक्षा असेल…,भारत माता की जय !, असे ट्वीट अतुल भातखळकर यांनी म्हटले होते. आता राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यावर टीका केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज रात्री आठ वाजता केलेल्या भाषणाचा अर्थ केवळ एवढाच आहे ‘ऑपरेशन सिंदूर’चा ‘सीझन-1’ संपलेला आहे पुढच्या ‘सीझन’ची भारतीयांना प्रतीक्षा असेल…
भारत माता की जय !
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) May 12, 2025
जितेंद्र आव्हाड यांनी भातखळकरांच्या ट्वीटला प्रत्युत्तर दिले होते. “काय वेब सीरिज सुरू केलीय का? वारंवार आमच्या माता-भगिनींचे कुंकू पुसण्याची वाट पाहणाऱ्यांची आता जनताच गय करणार नाही? परत पहेलगाम व्हायची वाट बघता आहात का? आवरते घ्या.” असे जितेंद्र आव्हाडांनी म्हटले होते.
काय वेब सीरिज सुरू केलीय का ?
वारंवार आमच्या माता भगिनींचे कुंकू पुसण्याची वाट पाहणाऱ्यांची आता जनताच गय करणार नाही ?
परत पहेलगाम व्हायची वाट बघता आहात का ?आवरते घ्या https://t.co/aKX1tD9GVJ
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) May 12, 2025
त्यासोबतच रोहिणी खडसे यांनीही अतुल भातखळकरांवर टीका केली होती. “तुम्ही काय पुन्हा एकदा पहलगाम व्हावा, पुन्हा माता भगिनींचं कुंकू पुसले जावे याची वाट पाहत आहात का? भाजप आमदारांना कोणत्याही गोष्टीचं गांभीर्य नाही. त्यांना वाटतं हे सगळं बिग बॉस, खतरों के खिलाडी यासारखे शो आहेत. म्हणून आता अतुल भातखळकर ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या सिजनची वाट पाहत आहेत. आपल्या नेत्याचे कौतुक तुम्ही खुशाल करा, पण त्याला काही मर्यादा असाव्यात.” असे रोहिणी खडसेंनी म्हटले होते.
मी मागे ही म्हटलं होतं की भाजपच्या आमदारांना कोणत्याही गोष्टीचं गांभीर्य नाही. त्यांना वाटतं हे सगळं बिग बॉस, खतरों के खिलाडी यासारखे शो आहेत. म्हणून आता भाजपचे आमदार @BhatkhalkarA ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या सिजनची वाट पाहत आहेत…
अहो अतुलजी, तुम्ही काय पुन्हा एकदा पहलगाम… https://t.co/EuEv7Td1Jy
— Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse) May 13, 2025
“मी मागे ही म्हटलं होतं की भाजपच्या आमदारांना कोणत्याही गोष्टीचं गांभीर्य नाही. त्यांना वाटतं हे सगळं बिग बॉस, खतरों के खिलाडी यासारखे शो आहेत. म्हणून आता भाजपचे आमदार अतुल भातखळकर ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या सिजनची वाट पाहत आहेत… अहो अतुलजी, तुम्ही काय पुन्हा एकदा पहलगाम व्हावा, पुन्हा माता भगिनींचं कुंकू पुसले जावे याची वाट पाहत आहात का? आपल्या नेत्याचे कौतुक तुम्ही खुशाल करा पण त्याला काही मर्यादा असाव्यात!”, असेही रोहिणी खडसे म्हणाल्या.