AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vidyanand Bapat: विद्यानंद बापटला कॅमेऱ्यासमोर हाणलं, प्रशांत जगताप भडकले, पुण्यामध्ये भाजपची दादागिरी…

Prashant Jagtap On Vidyanand Pune: विद्यानंद बापट हे tv9 मराठीशी बोलत असताना एका तरुणाने त्यांना झापड मारली, आता या प्रकरणावर काँग्रेस नेते प्रशांत जगताप यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Vidyanand Bapat: विद्यानंद बापटला कॅमेऱ्यासमोर हाणलं, प्रशांत जगताप भडकले, पुण्यामध्ये भाजपची दादागिरी...
| Updated on: Sep 03, 2026 | 12:54 PM
Share

Vidyanand Bapat Pune: गणेशोत्सव काळात पुण्यात डीजे बंदी आणि ध्वनीप्रदुषणावरुन सध्या जोरदार राडा सुरु आहे. या सगळ्या दरम्यान एका व्यक्तीची जोरदार चर्चा होत होती ती म्हणजे विद्यानंद बापट. सोशल मीडियावर त्यांच्या मराठीवरील प्रभुत्वाचे कौतुक होत आहे. या दरम्यान tv9 मराठीशी विद्यानंद बापट बोलत असताना एका तरुणाने थेट त्यांना झापड मारली आहे. पुण्यातील टिळक रोड परिसरात ही घटना घडली आहे. आता यावर काँग्रेस नेते प्रशांत जगताप यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

नेमकं काय घडलं?

विद्यानंद बापट हे टीव्ही ९ मराठीशी बोलत होते, गणेशोत्सवातील डीजेबाबत स्वत:ची भूमिका ते स्पष्टपणे मांडत होते. त्यावेळी एक तरुण अचानक आला आणि त्याने विद्यानंद बापट जोरात झापड मारली, त्यानंतर काही जण आले आणि त्यांनी तरुणाला मागे केले आणि त्याला रोखले, नंतर लगेचच पोलिसांकडे विद्यानंद बापट यांनी या प्रकरणासंदर्भात तक्रारही नोंदवली.  संपूर्ण घटना कॅमेरामध्ये कैद झाली. त्यानंतर विद्यानंद बापट यांनी घडलेल्या घटनेवर देखील प्रतिक्रिया दिली.

शरद पवार गट नेते प्रशांत जगताप म्हणाले की, “याचे कारण आहे की, विद्यानंद बापट हे पुणेकरांच्यावतीने या संदर्भातला आवाज मांडतायेत. कुठेही त्यांचा गणेशोत्सव आणि धार्मिक सणाला विरोध नाही, फक्त त्याला डीजे नावाची वाईट संस्कृती आली आहे, त्या संस्कृतीच्या माध्यमातून लोकांना या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे आजार होत आहे, या संदर्भाविषयी ते आवाज उठवत आहे, पण असं असताना सत्ताधारी मंडळीच्या पाठिंब्याने बापटांवर वेगवेगळे आरोप केले जात आहे, आणि आज तर थेट मारहाण करण्यापर्यंत मजल पोहोचली आहे. हे कुठेतरी या ठिकाणी पुण्यामध्ये सत्ताधारी भाजपची दादागिरी कशी वाढली आहे? तर चुकीच्या प्रवृत्तीला सरकारकडून किंवा सत्ताधाऱ्यांकडून पाठिंबा दिला जात आहे याचे एक वेगळे उदाहरण पाहायला मिळाले. पण या निमित्ताने पुण्यामध्ये अशाप्रकारे सामाजिक कार्यकर्त्यांवर हल्ला करणे किंवा पहाटे रिलस्टार संतोष पंडित यांनी केलेली अटक असेल, हा हुकुमशाहीची लक्षणे आहेत.”

Follow Us
अभिनेता टायगर श्रॉफ प्रकरणी खळबळजनक ऑडिओ क्लिप समोर, घटनेचा तपास...
अभिनेता टायगर श्रॉफ प्रकरणी खळबळजनक ऑडिओ क्लिप समोर, घटनेच्या तपासाला वेगळेच वळण
टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळ्या झाडल्या, बॉलिवूडची झोप उडवणारं कारण समोर
टायगर श्रॉफच्या गाडीवर धाडधाड गोळ्या झाडल्या, पण कारण काय? बॉलिवूडची झोप उडवणारं कारण समोर!
लडाखमधील सर्व खटले आता एकाच दिवशी? भारताच्या सर्वोच्च न्यायालयात...
लडाखमधील सर्व खटले आता एकाच दिवशी? सर्वोच्च न्यायालयात... नेमका निर्णय काय?
भिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा थरारक व्हिडीओ समोर; अचानक बाईकवरून..
Tiger shroff Video : अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा पहिला थरारक व्हिडीओ समोर; अचानक बाईकवरून आलेले तिघं...
अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार, 3 अज्ञातांकडून... पोलिसांची माहिती काय?
Latest Update : अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार, 3 अज्ञातांकडून... पोलिसांची माहिती काय?
फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सिंचन प्रकल्पांवरील अनावश्यक खर्च टाळा,
फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सिंचन प्रकल्पांवरील अनावश्यक खर्च टाळा, इतर योजनांमधील निधी...
राहुल गांधींचा मोदी-शाहांना इशारा! ‘व्होट चोरी’चा हिशेब चुकता करणार,
राहुल गांधींचा मोदी-शाहांना इशारा! ‘व्होट चोरी’चा हिशेब चुकता करणार, म्हणाले एक्सपायरी डेट जवळ आली
वनमंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यानंतर वाद; राजकीय प्रतिक्रियांना...
वनमंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यानंतर वाद; राजकीय प्रतिक्रियांना उधाण
पदवीधर निवडणुकीत विजयाचा विश्वास! कैलास पाटील म्हणाले, ठाकरे गट...
पदवीधर निवडणुकीत विजयाचा विश्वास! कैलास पाटील म्हणाले, ठाकरे गट...
आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड...
आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड सहभागी,