AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘देर आये कुछ दुरुस्त आये’, जीएसटीवरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचा भाजपला खोचक टोला

उद्यापासून जीएसटीचे नवे दर लागू होणार आहेत, यावर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाची पहिली प्रतिक्रिया समोर आली असून, अमोल कोल्हे यांनी भाजपला खोचक टोला लगावला आहे.

'देर आये कुछ दुरुस्त आये', जीएसटीवरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचा भाजपला खोचक टोला
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 21, 2025 | 9:31 PM
Share

आज मध्यरात्रीपासून देशात जीएसटीचे नवे दर लागू होणार आहेत, केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे, पूर्वी जीएसटीचे चार स्लॅब होते 28 टक्के, 18 टक्के, 12 टक्के आणि 5 टक्के त्यातील दोन स्लॅब रद्द करण्यात आले आहेत. जीएसटीचे 28 टक्के आणि 12 टक्के असे दोन स्लॅब रद्द करण्यात आले आहेत. आता केवळ 18 टक्के आणि 5 टक्के हे दोनच  स्लॅब लागू असणार आहे, यामुळे अनेक वस्तूंचे दर आता स्वस्त होणार आहेत. यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते खासदार अमोल कोल्हे यांनी भाजपला खोचक टोला लगावला आहे.

नेमकं काय म्हणाले अमोल कोल्हे?   

“देर आये कुछ दुरुस्त आये” असा खोचक टोला यावरून अमोल कोल्हे यांनी भाजपला लगावला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘वन नेशन वन टॅक्स अशी GST ची संकल्पना होती, त्यामुळे हे स्लॅब असणं अगोदरच गरजेचं होतं का? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

एक वडील आपल्या मुलाला चार वेळा रागवायचे आता ते दोनदाच रागावतात, आणि  मुलाला सांगतात बघ मी तुझ्यावर किती प्रेम करतो, त्याचा उत्सव साजरा कर. महागाई वर नियंत्रण आणण्यात  सरकारला अपयश आलं आहे. हे अपयश झाकण्याचा प्रयत्न सरकार यातून करत आहे. मात्र यामुळे नागरिकांना सवलत मिळणार असल्यानं नव्या बदलाचे स्वागत केले पाहिजे, सरकारचं अभिनदंन केलं पाहिजे. मात्र यामध्ये वन नेशन, वन टॅक्स होणं गरजेचं आहे, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

दरम्यान तीन तासाला एका शेतकऱ्याची आत्महत्या होत असताना,  हे सगळं समोर असताना उत्सव कसा साजरा करायचा? अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाच्या संबंधांबाबत आपल्याला मोठं अपयश आलेलं आहे. अमेरिकेकडून व्हिसावर निर्बंध घालण्यात आले आहेत, त्यामुळे आयटी क्षेत्र धोक्यात आहे. मग उत्सव कसा सजरा करायचा असा प्रश्न यावेळी खासदार अमोल कोल्हे यांनी उपस्थित केला आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...