AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! शरद पवारांनी निष्ठावान शिलेदार गमावला, नेत्याचं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन, राजकारणात मोठी पोकळी

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार आणि पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष राजीव देशमुख यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं आहे.  राजीव देशमुख यांच्या निधनामुळे राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.

मोठी बातमी! शरद पवारांनी निष्ठावान शिलेदार गमावला, नेत्याचं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन, राजकारणात मोठी पोकळी
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 21, 2025 | 3:36 PM
Share

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार आणि पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष राजीव देशमुख यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं आहे.  राजीव देशमुख यांच्या निधनामुळे राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे. राजू देशमुख हे चाळीसगाव विधानसभेचे माजी आमदार होते,  2009 ते 2014 या कार्यकाळात राजू देशमुख हे विधानसभेचे सदस्य होते, मात्र त्यानंतर  2014 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांचे विश्वासू सहकारी अशी राजीव देशमुख यांची ओळख होती.

राजीव देशमुख यांनी वयाच्या 55 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला,  त्यांना अचानक अस्वस्थ जाणवू लागल्यानं धुळे येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. परंतु रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात त्यांनी आपल्या नेतृत्वानं एक वेगळं स्थान निर्माण केलं. ते राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष होते, तसेच 2009 ते 2014 या कार्यकाळात राजू देशमुख हे विधानसभेचे सदस्य देखील होते.

शरद पवारांचे विश्वासू म्हणून ओळख  

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या उठावानंतर राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती, अनेक बड्या नेत्यांनी शरद पवार यांची साथ सोडून अजित पवार यांना पाठिंबा दिला, मात्र दुसरीकडे  राजीव देशमुख यांनी शरद पवार यांच्यासोबतच राहण्याचा निर्णय घेतला, शरद पवार यांचे निकटवर्ती म्हणून राजीव देशमुख यांना ओळखलं जायचं, त्यामुळे पक्षात त्यांना महत्त्वाचं स्थान होतं. पक्षाने त्यांच्यावर प्रदेश उपाध्यक्ष पदासारखी मोठी जबाबदारी देखील सोपवली होती.

राजू देशमुख हे चाळीसगाव विधानसभेचे माजी आमदार होते, ते  2009 ते 2014 या कार्यकाळात विधानसभेचे सदस्य होते. मात्र त्यानंतर 2014 साली झालेल्या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.  आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी महाविकास आघाडीकडून राजू देशमुख यांच्या नावाची चर्चा होती, मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...