AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : बिहारी लोकांना शिव्या देण्याआधी….महाराष्ट्रीयन लोकांच्या बिहारमधील आदरातिथ्याचा व्हिडीओ पाहाच; पोलीस ऑफिसरला सलाम ठोकाल!

नेपाळच्या महापुरात अडकलेल्या महापुरात महाराष्ट्रातील काही लोक अडकले होते. याच महाराष्ट्राच्या नागरिकांना नंतर बिहारमध्ये आणण्यात आले. या लोकांची बिहार सरकारतर्फे काळजी घेण्यात आली. त्यांना वेळेवर जेवण देण्यात आले.

Video : बिहारी लोकांना शिव्या देण्याआधी....महाराष्ट्रीयन लोकांच्या बिहारमधील आदरातिथ्याचा व्हिडीओ पाहाच; पोलीस ऑफिसरला सलाम ठोकाल!
nepal flash floodImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 30, 2026 | 9:49 PM
Share

Nepal Flash Floods : भारतात प्रादेशिक अस्मितेला खूप महत्त्व आहे. किंबहुना भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या प्रदेशिक अस्मितेचा जास्तच प्रचार, प्रसार झाला. याच प्रादेशिकतावादातून नंतर वेगवेगल्या राज्यात स्थानिक राजकीय पक्षांची निर्मिती झाली. आज दक्षिणेकडे तेथील दाक्षिणात्त्य अस्मितेला सर्वोच्च मानून अनेक राजकीय पक्ष सत्तेत आहेत. महाराष्ट्रातही महाराष्ट्र नवनिर्माण सेना यासारखे पक्ष आजही मराठी अस्मितेचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवून आपले राजकारण करत आहेत. यूपी, बिहारी महाराष्ट्रात येऊन धुडगूस घालत आहेत, नोकऱ्या खात आहेत, असा आरोप केला जातो. त्यातून नंतर परराज्यातील लोकांना मारहाण झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. परंतु आणीबाणीच्या परिस्थितीत भारतातील नागरिक आपल्या प्रादेशिक अस्मिता सोडून देश सर्वोच्च मानत एकत्र आलेले आहेत. सध्या त्याचेच ज्वलंत उदाहरण समोर आले आहे. नेपाळच्या महापुरात अडकलेल्यांची सुटका झाल्यानंतर महाराष्ट्रातील काही लोकांची बिहार सरकारने, तेथील लोकांनी खूप काळजी घेतली आहे. या आदिरातीथ्याचे काही व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.

स्थानिक नागरिक, पोलीस यंत्रणादेखील मदतीला धावून आली

नेपाळच्या महापुरात अडकलेल्या महापुरात महाराष्ट्रातील काही लोक अडकले होते. याच महाराष्ट्राच्या नागरिकांना नंतर बिहारमध्ये आणण्यात आले. या लोकांची बिहार सरकारतर्फे काळजी घेण्यात आली. त्यांना वेळेवर जेवण देण्यात आले. त्यांच्या राहण्याची, कपड्यांची व्यवस्था करण्यात आली. एवढेच नव्हे तर तेथील स्थानिक नागरिक, पोलीस यंत्रणादेखील महाराष्ट्रातील नागरिकांच्या मदतीला धावून आले. समोर आलेल्या व्हिडीओत एक पोलीस अधिकारी महाराष्ट्रातील नागरिकांना जेवण वाढताना दिसतोय. विशेष म्हणजे जेवण खूपच छान आहे, अशी प्रतिक्रियाही काही महिलांनी दिल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

शिव्या देताना याची जाणीव ठेवा

सोशल मीडियावर समोर आलेल्या या व्हिडीओत संंबंधित व्यक्तीने नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील लोकांना बिहार सरकारने सुखरुप पटना शहरात आणले. महाराष्ट्रातील लोकांना बिहार पोलिसांनी जेवण दिले, राहणे, झोपण्याची सोय केली, असे सांगितले. तसेच पुढील वेळी बिहारी लोकांना शिव्या देताना याची जाणीव ठेवा, असे आवाहन केले. सोबतच मनसेचे Zombies बिहारी लोकांना शिव्या देणारच, असा टोलाही संबंधित युजरने लागवाला आहे. सध्या हा व्हिडीओ खूपच चर्चेचा विषय ठरला आहे.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा