साताऱ्यात नवा कोरोना विषाणू, अनेक तालुके कोरोना हॉटस्पॉट, प्रशासन अलर्टवर

जिल्हयात कोरोनाबाधित रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असून येथे कोरोनाची नवी प्रजाती आढळलेली आहे. (new corona strain Satara)

साताऱ्यात नवा कोरोना विषाणू, अनेक तालुके कोरोना हॉटस्पॉट, प्रशासन अलर्टवर
सातारा कोरोना

सातारा : जिल्हयात कोरोनाबाधित रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असून येथे कोरोनाची नवी प्रजाती आढळलेली आहे. येथे आढळलेल्या एका कोरोना रुग्णामध्ये नवे म्युटेशन्श (new corona strain) आढळल्य़ामुळे प्रशासन अलर्ट झाले आहे. विशेष म्हणजेच कोरोनाचा प्रसार फक्त सातारा शहरापर्यंतच सीमित नसून त्याचा तो गावापातळीपर्यंत पोहोचला आहे. जिल्ह्यातील माण, खटाव, कोरेगाव तालुक्यात अनेक ठिकाणी कोरोनाचे हॉटस्पॉट जाहीर करण्यात आले आहेत. (new corona strain found in Satara health care department on alert)

अनेक तालुके कोरोना हॉटस्पॉट

मागील काही महिन्यांच्या विश्रांतीनंतर आता पुन्हा एकदा कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. सातारा जिल्ह्यातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून येथील प्रशासन सतर्क झाले आहे. विशेष म्हणजे या जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार फक्त सातारा जिल्ह्यापर्यंतच सीमित राहीला नाहिये. मान, खटाव, कोरेगाव अशा तालुक्यांतसुद्धा कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. या तालुक्यांत कोरोनाचे अनेक हॉटस्पॉट तयार झाले आहेत. या तालुक्यातील एका गावातील चार रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते. पुण्यातील विषाणू परिक्षण प्रयोगशाळेत या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यातील एका कोरोना रुग्णामध्ये कोरोनाची नवी प्रजाती आढळली असून सध्या पशासन अलर्टवर आहे.

विशेष काळजी घेण्याचे आवाहन

कोरोनाची नवी प्रजाती आढळल्यामुळे येथे प्रशासन सतर्क झाले आहे. कोरोना विषाणूमधील गुणसूत्र बदलल्यामुळे सध्या आरोग्य प्रशासनाकडून विशेष काळजी घेतली जात आहे. तसे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक सुभाष चव्हाण यांनी केले आहे. त्याबरोबरच कोरोना विषाणूची गुणसूत्रं बदलली असली तरी कोणतीही भीती बाळगू नये. नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

राज्यात नाईट कर्फ्यूचा विचार

राज्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर अशा मोठ्या शहरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या लक्षणीयरित्या वाढताना दिसतेय. त्यामुळे राज्य सरकार, तसेच आरोग्य विभागाने नागरिकांना कोरोना प्रतिबंधक नियम पाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच, नागरिकांनी हे नियम पाळले नाहीत, तर पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्याची वेळ येऊ शकते, असे सूतोवाच सरकारमधील अनेक मंत्र्यांनी केले आहे. मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी तर राज्य सरकार नाईट कर्फ्यू लागू करण्याचा विचार करत असल्याचे सांगितले आहे. संध्याकाळी सहा ते दुसऱ्या दिवसाचे सकाळचे नऊ या कालावधीत हा नाईट कर्फ्यू लागू करण्याचा विचार सुर असल्याचं  वडेट्टीवार यांनी सांगतिलं आहे. दरम्यान आगामी काळात कोरोना रुग्णांमध्ये अशाच प्रकारे वाढ झाली तर प्रशानस कठोर निर्णय घेऊ शकते.

इतर बातम्या :

कोरोनाचे नियम मोडल्यास गुन्हे दाखल होणार, हॉटेल, लग्न समारंभांवर करडी नजर; ठाणे पालिका आयुक्त अ‍ॅक्शन मोडमध्ये!

… तर लॉकडाऊनचा निर्णय घ्यावाच लागेल; छगन भुजबळांचा इशारा

(new strain found in Satara health care department on alert)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI