AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठ्या रकमेसाठी सासरी होणारा छळ अमृताला झालेला नकोसा, अखेर संपवलं आयुष्य

प्रेमविवाह अमृताला पडला महागात, वर्षभरात संपवलं आयुष्य, मोठ्या रकमेसाठी सासरी व्हायचा छळ... धक्कादायक घटनेमुळे महाराष्ट्रात संतापाचं वातावरण... पोलिसांकडून तपास सुरु

मोठ्या रकमेसाठी सासरी होणारा छळ अमृताला झालेला नकोसा, अखेर संपवलं आयुष्य
| Updated on: Oct 07, 2025 | 12:18 PM
Share

आजच्या काळात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. तर दुसरीकडे मात्र सासरच्या जाचाला कंटाळून नवीनच लग्न झालेल्या महिला स्वतःचं आयुष्य संपवत आहे. पुणे येथील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण ताज असताना पुन्हा एका महिलेने स्वतःचं आयुष्य संपवलं आहे. सासरच्या जाचाला कंटाळून अमृता गुरवने मृत्यूला कवटाळलं आहे. सांगली जिल्ह्यातील इश्वरपूर येथे राहणाऱ्या अमृता गुरव हिने सासरच्या जाचामुळे स्वतःचं आयुष्य संपवलं आहे. विष प्राशन करुन तिने आत्महत्या केल्याची माहिती समोर ये आहे.

अमृता गुरव हिच्या आत्महत्याचे माहिती पोलिसांनी कळल्यानंतर पोलिसांनी पती ऋषिकेश गुरव, सासू अनुपमा गुरव, सासरा मधुकर गुरव आणि नणंद ऋतुजा गुरव यांना अटक केली आहे. मुलीच्या आत्महत्येनंतर अमृताची आई वंदना कोले यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. मिळालेल्या माहितीनुसार, अमृता हिने वर्षभरापूर्वी कुटुंबियांच्या विरोधात ऋषिकेश याच्यासोबत लग्न केलं होतं.

कधी झालं होतं लग्न?

26 डिसेंबर 2024 मध्ये अमृता हिने कुटुंबियांच्या विरोधात ऋषिकेश याच्यासोबत लग्न केलं. पण लग्नाच्या काही महिन्यांनंतर अमृता हिचा छळ करण्यास सासरच्या मंडळींनी सुरुवात केली… सासू अनुपमा हिच्या आजारपणासाठी माहेरहून तब्बल दोन लाख रुपये आण.. असा दबाव अमृता हिच्यावर सतत टाकण्यात आला… तिला मारहाण करुन मानसिक छळ करत असल्याची माहिती देखील समोर आली आहे.

पती ऋषिकेश पत्नी अमृता हिला मारहाण करायचा… तर सासू आणि नणंद सतत अमृता हिचा अपमान करीत होत्या.. ‘तू अमृताला सोडून दे… आपल्या जातीतील मुलीसोबत तुझं लग्न करु…’, असं ऋषिकेश याचा माना नंदकिशोर म्हणायचा… पोलिसांनी मामाला देखील अटक केली आहे. आता पोलिस याप्रकरणी कसून चौकशी करत आहेत.

मिळालेल्या महितीनुसार, अमृताच्या आत्महत्येनंतर तिच्या आई आल्या होत्या. मुलीचा मृतदेह पाहिल्यानंतर आई – वडिलांनी हंबरडा फोडला. आता याप्रकरणी  पुढे काय होणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सांगायचं झालं तर, देश आता प्रगतीपथावर आहे… असं सांगितलं जातं. पण महिलांसाठी सुरक्षित वातावरण कुठे आहे…? हा एक मोठा प्रश्न आहे. रोज कुठे ना कुठे महिलांवर बलात्कार होत आहे. लहान मुलींपासून वृद्ध महिलांवर अत्याचार झाल्याच्या  अनेक घटना देखील समोर आल्या आहेत. तर, अनेक ठिकाणी सासरच्या जाचाला कंटाळून महिला आत्महत्या करत आहे… ही देशातील सर्वात मोठी समस्या आहे.

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?