AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिल्पा शेट्टीच्या अडचणी थांबता थांबेना, घरी पोहोचले पोलीस, तब्बल 4.30 तास चौकशी कारण…

Shilpa Shetty - Raj Kundra: मुंबई पोलिसांच्या कचाट्यात अडकलेत शिल्पा शेट्टी - राज कुंद्रा..., अटचणींमध्ये मोठी वाढ... अभिनेत्रीच्या घरी पोलिसांची चौकशी... तब्बल 4.30 तास चौकशी कारण..., सध्या सर्वत्र अभिनेत्रीची चर्चा...

शिल्पा शेट्टीच्या अडचणी थांबता थांबेना, घरी पोहोचले पोलीस, तब्बल 4.30 तास चौकशी कारण...
फाईल फोटो
| Updated on: Oct 07, 2025 | 9:14 AM
Share

Shilpa Shetty – Raj Kundra: अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि पती राज कुंद्रा यांच्या अडचणीत मोठी झाल्याची माहिती समोर येत आहे. 60 कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणात शिल्पा आणि राज पोलिसांच्या कचाट्यात अडकले आहे. 60 कोटींच्या फसवणूक प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने अभिनेत्रीची चौकशी केली.शिल्पा शेट्टीच्या घरी जाऊन आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने चौकशी केल्याची माहिती समोर येत आहे. याआधी राज कुंद्रा यांचीही चौकशी करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तब्बल 4.30 तास दोघांची चौकशी करण्यात आली.

राज आणि शिल्पा काय म्हणाले?

रिपोर्ट्सनुसार, शिल्पाचा पती राज कुंद्रा याने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, फसवणुकीची तक्रार दाखल करणारे दीपक कोठारी यांनी एका एनबीएफसीकडून 60 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. त्यानंतर कोठारीच्या कंपनीत हे इक्विटी म्हणून समायोजित करण्यात आलं. या रकमेपैकी 20 कोटी रुपये सेलिब्रिटी प्रमोशन, ब्रॉडकास्टआणि इतर खर्चासाठी वापरले गेले. बिपाशा बासू आणि नेहा धुपिया यांना देखील यासाठी पैसे देण्यात आले. राज याने पोलिसांना प्रमोशनचे फोटो दाखवल्याची माहिती देखील समोर येत आहे.

फसवणूक प्रकरणात शिल्पाची भूमिका कोणती?

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या कंपनीची सध्या चौकशी सुरु आहे, त्या कंपनीची शिल्पा मोठी शेअर होल्डर आहे. त्यामुळे अभिनेत्रीची देखील चौकशी सुरु आहे. पुरावे समोर आल्यानंतर एक मोठी गोष्ट देखील समोर येत आहे आणि ती म्हणजे, शेअर होल्डर असून देखील शिल्पाने सेलिब्रिटी फी घेतली आहे. ज्याला खर्चात दाखवण्यात आलं आहे. जे निधीचा गैरवापर दर्शवते.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

आर्थिक गुन्हे शाखेने ऑगस्ट 2025 मध्ये शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्यावर 60.4 कोटी रुपयांच्या फसवणुकीचे आरोप दाखल केले. सप्टेंबर महिन्यात त्यांच्या विरोधात लूकआउट नोटीस देखील जारी करण्यात आली. यूवाय इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडचे ​​संचालक दीपक कोठारी यांनी तक्रार दाखल केली आहे, ज्यामध्ये राज आणि शिल्पाने 2015 ते 2023 दरम्यान त्यांना व्यवसायात गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप आहे.

भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?.
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल.
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा.